Skin Care Tips  esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : आठ दिवसावर आलंय लग्न तर या चूका करू नका, लग्नादिवशी चेहऱ्याची लागेल वाट!

लग्नाच्या एक-दोन दिवस आधी ब्लीच करू नका, काही वेळा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात

सकाळ डिजिटल टीम

Skin Care Tips : 

प्रत्येक मुलीच्या जीवनात लग्न सोहळा अत्यंत महत्त्वाचा असतो. लग्न ठरल्यापासूनच तिचे अनेक प्लॅन्स तयार होत असतात. हळदी, मेहंदी, प्री वेडींग आणि लग्न यासाठी काय काय लूक करायचे याचेही नियोजन झालेले असते. वेगवेगळ्या दिवसासाठी नवा लूक आणि ब्युटीशियनही ठरलेली असते.

पण काहीच दिवसावर लग्न आलेले असताना अचानक नवरीच्या चेहरा आणि त्वचेवर काहीतरी स्पॉट दिसू लागतात. सगळेच तिची समजूत घालतात की, लग्नाचं टेन्शन आहे त्यामुळे असे होत आहे, पण खरे तर गोष्ट वेगळीच असते. लग्नाच्या आधी जेव्हा सुंदर दिसण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात. त्या गोष्टींचा परिणाम म्हणून हे स्पॉट चेहऱ्यावर येतात.

लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीसाठी खास असतो आणि या खास दिवशी तिला सर्वात सुंदर दिसायचे असते. कारण, लग्नात सर्वांच्या नजरा वधूवर खिळलेल्या असतात. जर तुमचे लग्नही काही दिवसात होणार असेल तर तुम्हीही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

त्वचा एक्सफोलिएट करू नका

चेहऱ्यापासून हात आणि पायांपर्यंतची त्वचा वारंवार एक्सफोलिएट करू नका. यामध्ये चेहरा आणि त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते. परंतु जास्त स्क्रबिंगमुळे तुमच्या त्वचेला नुकसान होऊ शकते. यामुळे चेहऱ्यावर पुरळ, खाज आणि कोरडेपणा वाढू शकतो.

फेशिअल वॅक्सिंग

जर तुम्ही लग्नापूर्वी फेशियल वॅक्सिंग करवून घेण्याचा विचार करत असाल तर ही चूक करू नका. वॅक्सिंगनंतर बहुतेक लोकांना पुरळ, बारीक मुरुम, त्वचेची जळजळ यासारख्या समस्या सुरू होतात आणि ते बरे होण्यास थोडा वेळ लागू शकतो. विशेषत: तुमची त्वचा संवेदनशील असेल तर ही चूक करू नका.

ब्लीच

जर तुम्ही ब्लीच करण्याचा विचार करत असाल, तर लक्षात ठेवा की लोक ब्लीचचा वापर त्वचेचा रंग उजळण्यासाठी किंवा झटपट चमक आणण्यासाठी करतात. मात्र, लग्नाच्या एक-दोन दिवस आधी ब्लीच करू नका, काही वेळा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. (Face Care Tips)

घरगुती उपाय करू नका

तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोणतेही घरगुती उपाय करत असाल तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. तुम्ही कोणतेही नवीन ब्युटी प्रोडक्ट किंवा स्किन केअर रेमेडी वापरत असाल तर आधी पॅच टेस्ट करा जेणेकरून तुमच्या चेहऱ्याचे पोषण होण्यासाठी या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या.

या गोष्टींचीही काळजी घ्या

दररोज 7 ते 8 तासांची चांगली झोप घ्या, कारण कमी झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळाची समस्या उद्भवू शकते. याशिवाय जास्त तेलकट पदार्थ आहारातून काढून टाका जेणेकरून पिंपल्स इत्यादी समस्यांची भीती राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT