Sleep Disorders and Problems Sakal
लाइफस्टाइल

Sleep Disorders and Problems : पूर्ण झोप होत नाही, दिवसा झोप येते?

रात्रीतून तुमचा श्वासोच्छवास नीट होत असूनही गळ्याच्या बाजूला श्वसनमार्गात तात्पुरते अडथळे येतात. जर तुमचे वजन वाढलेले असेल किंवा टॉन्सिल, जबडा आणि पडजीभ यांची संरचना वेगळी असते, अशावेळी ऑक्सिजन लेव्हल कमी होते.

सकाळ वृत्तसेवा

रात्रीतून तुमचा श्वासोच्छवास नीट होत असूनही गळ्याच्या बाजूला श्वसनमार्गात तात्पुरते अडथळे येतात. जर तुमचे वजन वाढलेले असेल किंवा टॉन्सिल, जबडा आणि पडजीभ यांची संरचना वेगळी असते, अशावेळी ऑक्सिजन लेव्हल कमी होते.

थोड्या वेळाने मेंदूला सिग्नल जाऊन यंत्रणा पुन्हा कामाला लागते आणि मग ते नॉर्मल होते आणि असे झोपेत वारंवार होत राहते. यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि मग त्यांना दिवसा झोप येते. काही काही जणांना ड्रायव्हिंग करताना, ऑफिसमध्ये तर काही जण सांगतात, की सिग्नलला थांबलो तरी झोप येते. यासाठी तुमचे झोपेचे गणित नेमके कोणत्या कारणामुळे बिघडले, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

तीन महिन्यांपेक्षा जास्त जर झोप लागत नसेल तर

निद्रानाश यात दोन प्रकार येतात. तात्पुरता किंवा दीर्घकालीन किंवा क्रोनिक. जेव्हा एखाद्या कामाच्या ताणामुळे झोप लागत नाही किंवा जवळच्या व्यक्तीचं निधन झालंय किंवा काही अन्य कारण आहे, अशा स्थितीत हा तात्पुरता निद्रानाश होऊ शकतो.

पण काही काळानंतर मात्र तुमची झोप नॉर्मल होते. पण जर हा निद्रानाश तीन महिन्यांपेक्षा जास्त राहिला तर मात्र तो दीर्घकालीन निद्रानाश प्रकारात मोडतो. त्यामध्ये व्यक्तीला झोप लागायला त्रास होतो; तसेच मध्येच जाग येऊन झोपमोड होते आणि परत झोप लागत नाही.

छातीत धडधडणे, भीतिदायक स्वप्न?

हे प्रकार पॅरासोम्निया या आजारात दिसून येतात. ज्या हालचाली झोपेच्या सुरुवातीला, झोपेमध्ये किंवा झोपेतून उठताना होतात त्या गोष्टी पॅरासोम्नियामध्ये येतात. यामध्येदेखील दोन प्रकार येतात. नॉन रेम हालचाली आणि रेम हालचाली.

‘नॉन रेम’मध्ये मध्येच जाग येणे, दचकून जागे होणे, रात्रीच्या वेळी किंवा झोपेत चक्क जागे असल्याप्रमाणे चालते, झोपेत बोलते, हालचाली करते, उठून बसते. डॉ. स्मिता धाडगे म्हणाल्या, की यांच्यातील गंभीर प्रकारात अनेकदा काही झोपेत खातातदेखील तर काही जण हिंसक होत भिंतीवर डोके आपटून घेतात.

छातीत धडधडणे, भीतिदायक स्वप्न पडणे, कुठून तरी पडतोय असे वाटणे, असे मानसिक स्वास्थ्याशी संबंधित अनेक प्रकार येतात. तसेच स्लीप पॅरालिसिस म्हणजे अंग आखडणे हे प्रकार येतात. अनेकदा हे मेंदूतील रसायनामुळे होत असतात,

तर काहींमध्ये हार्मोनमुळे आणि काहींमध्ये हे जनुकीय बदलांमुळे होतात. हा प्रकार अनेकदा अनुवांशिकदेखील असतो. यावर तीन प्रकाराने उपचार करता येतात, ड्रग थेरपी म्हणजेच औषधोपचार, कॉग्नेटिव्ह बेहेविअरल थेरपी आणि स्लीप हायजिन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT