Sonakshi Sinha Choker esakal
लाइफस्टाइल

Sonakshi Sinha Choker : सोनाक्षीने रिसेप्शनला नेसलेल्या साडीपेक्षा तिच्या हिरव्या चोकरचीच जास्त चर्चा; किंमत जाणून व्हाल हैराण.!

Sonakshi Sinha Choker : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा रिसेप्शन पार्टीतला लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Sonakshi Sinha Choker : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाहबंधनात अडकली. या दोघांनी एकमेकांना तब्बल ७ वर्षे डेट केले होते. त्यानंतर, हे कपल रविवारी (२३ जूनला) नोंदणी विवाह पद्धतीने विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला जवळचे मित्र-मंडळी, नातेवाईक आणि दोघांचे आई-वडिल उपस्थित होते.

त्यानंतर, या दोघांनी मुंबईत एका ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शन पार्टीत त्यांचे मित्रमंडळी, बॉलिवूडमधील कलाकार आणि जवळच्या व्यक्तींसोबत जवळपास १००० लोक सहभागी झाले होते. सोनाक्षीने तिच्या लग्नात सिंपल-सोबर लूक केला होता. परंतु, रिसेप्शन पार्टीत ती लाल रंगाच्या सुंदर पारंपारिक साडीत दिसून आली.

तिचा हा पारंपारिक लूक चाहत्यांना कमालीचा आवडला. या साडीवर तिने सुंदर चोकर गळ्यात घातला होता. या चोकरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चोकरची किंमत वाचून तुम्हाला ही आश्चर्याचा धक्का बसेल. सोनाक्षीचा हा लाल साडीवरील लूक कसा होता? आणि त्या चोकरची किंमत किती? चला तर मग जाणून घेऊयात.

सोनाक्षीचा रिसेप्शन लूक कसा होता?

सोनाक्षीच्या रिसेप्शन लूकबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाक्षीने तिच्या रिसेप्शनला लाल रंगाची सुंदर बनारसी सिल्क साडी नेसली होती. या साडीवर चंद्राच्या बुटीची आकर्षक सोनेरी डिझाईन होती. सोनाक्षीची ही साडी 'रॉ मॅंगो' या ब्रॅंडकडून घेण्यात आली होती.

या ब्रॅंडच्या ऑफिशिअल वेबसाईटवर या साडीची किंमत तब्बल ७९,८०० रूपये सांगितली जात आहे. या बनारसी सिल्क साडीचा लूक करण्यासाठी सोनाक्षीने तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या, गळ्यात हिरव्या रंगाचा कुंदन चोकर आणि कानात मोठे झुमके घातले होते.

सोनाक्षीचा चोकर का आहे खास?

रिसेप्शन पार्टीत सोनाक्षीने लाल रंगाच्या बनारसी सिल्क साडीवर हिरव्या रंगाचा कुंदन चोकर गळ्यात घातला होता. या चोकरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या चोकरमुळे तिच्या लूकला चारचॉंद लागले होते.

Sonakshi Sinha

सोनाक्षीने गळ्यात घातलेला हा चोकर दिग्दर्शक निर्माता करण जोहरच्या ‘त्यानी ज्वेलरी’ (Tyani Jewellery) या ब्रॅंडचा आहे. त्यानीच्या वेबसाईटवर या चोकरबद्दल देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीच्या या चोकरची आणि त्यावरील मॅचिंग कानातल्यांची एकूण किंमत तब्बल ४ लाख ६५ हजार रूपये आहे. या महागड्या कुंदन चोकरने सोनाक्षीच्या लूकमध्ये आणखी भर घातली एवढ नक्की.

सोनाक्षीच्या बांगड्या

सोनाक्षीने तिचा रिसेप्शन लूक पूर्ण करण्यासाठी लाल रंगाच्या सिल्क बनारसी साडीवर हातात सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या. तिच्या या बांगड्यांची एकूण किंमत तब्बल २१ लाख २५ हजार रूपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या लाल साडीवर सोनाक्षीने परिधान केलेल्या दागिन्यांमुळे तिचा लूक आकर्षक दिसत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT