South India Travel esakal
लाइफस्टाइल

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

South India Travel : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायला आवडते. यासाठी तुम्ही दक्षिण भारताची निवड करू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

South India Travel : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये उकाडा प्रचंड वाढला आहे. विशेष म्हणजे भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळ्यात वेगवेगळे हवामान असते. काही ठिकाणी तापमान दमट असते तर काही ठिकाणी तापमान कमी असते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला जाणार आहात तेथील तापमानाची माहिती आधीच गोळा करा.

खरे तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायला आवडते. यासाठी तुम्ही दक्षिण भारताची निवड करू शकता. कारण, दक्षिण भारतामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही थंड वातावरणात फिरण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकाल. मे आणि जून महिन्यात फिरायला जाण्यासाठी ही ठिकाणे बेस्ट ऑप्शन आहेत. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

मुन्नार

मे आणि जूनमध्ये भेट देण्यासाठी मुन्नार हे ठिकाण बेस्ट आहे. केरळ राज्यामध्ये मुन्नार हे ठिकाण स्थित आहे. हे लोकप्रिय पर्यटनस्थळ असून मे आणि जूनमध्ये येथील वातावरण थंड असते. येथील मोकळ्या नद्या, नयनरम्य टेकड्या आणि सुंदर चहाच्या बागा असलेले मुन्नार स्वर्गापेक्षा काही कमी नाही. विशेष म्हणजे दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर अनामुदी शिखर मुन्नारमध्ये आहे.

कुन्नूर

दक्षिण भारतातील हे आणखी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. निलगिरी पर्वतांमध्ये वसलेले हे ठिकाण हिरवळीने नटले आहे. या दिवसांमध्ये कुन्नूरचे हवामान आल्हाददायक असते. तुम्ही या परिसरातल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता. त्यासोबत तुम्ही येथे ट्रेकिंगचा ही आनंद घेऊ शकता. येथील नयनरम्य निसर्गाच्या तुम्ही प्रेमात पडाल यात काही शंका नाही.

ऊटी

तामिळनाडू राज्यातील हे सर्वोत्तम पर्यटनस्थळ आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. उन्हाळ्यात फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण देखील निलगिरी पर्वतरांगेमध्ये वसले असून येथील दऱ्याखोऱ्या, उंच टेकड्या, चहाच्या बागा आणि झरे आहेत. येथील आल्हाददायक वातावरणामध्ये तुम्ही निवांत वेळ घालवू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT