Summer Cloths
Summer Cloths Sakal
लाइफस्टाइल

Summer Clothes: उन्हाळ्यात कपड्यांचा रंग फिका पडू नये यासाठी खास टिप्स; जाणून घ्या

पुजा बोनकिले

Summer Clothes How protect dark color Clothes during summer seasons

उन्हाळा सुरू होताच त्वचेची आणि आरोग्याची काळजी घेतात. सुर्याच्या अतिनिलकिरणांमुळे फक्त त्वचा नाही तर कपड्यांचे देखील नुकसान होते. हिवाळ्यात कपडे धुतल्यावर सुकवण्यास बाहेर टाकल्यास रंग फिका पडत नाही पण उन्हाळ्यात कपड्यांवरचा रंग पिका पडतो. उन्हाळ्यात काळा, पिवळा, नीळा, गुलाबी आणि लाल रंगाच्या कपड्यांचा रंग फिका पडतो. याशिवाय सुती कपडे देखील खराब होतात. कडक उन्हाळ्यात कपड्यांचा रंग फिका पडू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • ऊन कमी झाल्यावर कपडे धुवावे

अनेक लोक सकाळीच कपडे धुतात आणि सुकवण्यासाठी बाहेर टाकतात. दिवसभर कपडे उन्हात राहतात. कपडे सुर्यप्रकाशात जास्तवेळ राहिल्याने कडक होतात आणि त्याचा रंग फिका पडतो. यामुळे उन्हाळ्यात ऊन कमी झाल्यावर कपडे बाहेर सुकवायसा टाकावे. यामुळे कपड्यांचा रंग टिकून राहील.

  • सुती कपड्यांची कशी काळजी घ्यावी

सुती कपडे पातळ असतात. असे कपडे धुतल्यानंतर उलटे करूनच बाहेर सुकण्यासाठी टाकावे. सुती कपडे 30 ते 40 मिनिटांनंतर काढून घ्यावे. सुती कपडे प्रेस करायला वेळ लागतो, यामुळे सुट्टीच्या दिवशी कपडे धुवावे. सुती कपड्यांवर थोडे पाणी टाकून प्रेस केल्यास लवकर होते.

  • कपडे दोरीवर उलके करून टाकावे

अनेक लोक कपडे धुतल्यावर लगेच सुकण्यासाठी दोरीवर टाकतात. पण उन्हाळ्यात असे करू नका. कपडे उलटे करून दोरीवर टाकावे. यामुळे सुर्यप्रकाशाचा थेट परिणाम कपड्याच्या रंगांवर होणार नाही. यामुळे कपड्यांचा रंग फिका पडणार नाही.

  • सावलीत सुकवावे

उन्हाळ्यात कपडे सुकवताना सावलीत टाकावे. सावलीत कपडे टाकल्याने कपड्यांचा रंग सुरक्षित राहतो. अनेकवेळा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी 8 वाजेपर्यंत सौम्य सुर्यप्रकाश येतो. तुम्ही थोडावेळ कपडे बाहेर टाकू शकता आणि तासाभरानंतर कपडे काढून घ्यावे. यामुळे कपड्यांचा रंग फिका पडणार नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT