Summer Fashion Tips  esakal
लाइफस्टाइल

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Summer Fashion Tips : या दिवसांमध्ये आरामदायक आणि हलकेफुलके कपडे परिधान करण्यावर तरूणींचा भर असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Summer Fashion Tips : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. या वाढत्या उन्हाळ्यामध्ये आरोग्यासोबतच त्वचेची अन् केसांची खास काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये आरामदायक आणि हलकेफुलके कपडे परिधान करण्यावर तरूणींचा भर असतो. त्यामुळे, उन्हाचा त्रास होत नाही आणि आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली जाते.

उन्हाळ्यात कपड्यांची योग्य फॅशन केल्यावर तुमचा लूक देखील बेस्ट दिसतो आणि तुम्हाला कम्फर्ट देखील मिळतो. या दिवसांमध्ये तरूणी खास करून चिकनकारी कुर्ती परिधान करण्याला प्राधान्य देतात. चिकनकारी कुर्ती दिसायला अतिशय सुंदर दिसते आणि कुर्ती परिधान केल्यावर त्यात आरामदायक वाटते. त्यामुळे, आजकाल सर्व वयोगटातील महिलांना चिकनकारी कुर्ती परिधान करायला आवडते.

परंतु, अनेकदा महिलांना ही चिकनकारी कुर्ती स्टाईल कशी करायची? हे समजत नाही. मात्र, तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला चिकनकारी कुर्ती स्टाईल करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स.

पलाझोसोबत करा स्टाईल

अनेक तरूणी चिकनकारी कुर्ती जिन्सवर किंवा लेगींन्सवरच कॅरी करताना दिसतात. परंतु, पलाझोसोबत देखील चिकनकारी कुर्ती बेस्ट दिसते, यात काही शंका नाही. तुम्ही पांढऱ्या किंवा ब्लॅक रंगाच्या पलाझोसोबत कोणत्याही रंगाची चिकनकारी कुर्ती स्टाईल करू शकता. यामुळे, तुमचा लूक सुंदर दिसेल. खास करून शिफॉन फॅब्रिकचा पलाझो परिधान करा, यामुळे तुमचा लूक भारी दिसेल. (style with Palazzo)

मोकळे केस अन् झुमके

चिकनकारी कुर्ती परिधान केल्यावर मोकळे केस सोडा, यामुळे तुमचा लूक सुंदर दिसेल. कुर्ती परिधान केल्यावर मोकळे केस सोडा किंवा मोकळ्या केसांमध्ये सुंदर हेअरस्टाईल करा.

चिकनकारी कुर्तीवर कानात झुमके खूप खुलून दिसतात. त्यामुळे, कानात सुंदर झुमके घालायला विसरू नका. खास करून ऑक्सिडाईज्ड किंवा कुंदनचे झुमके या प्रकारच्या कुर्तीवर बेस्ट दिसतात. (Loose hair and zumka earrings)

हाय हील्स आहेत बेस्ट ऑप्शन

चिकनकारी कुर्तीचा लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही पायांमध्ये हाय हील्स घालू शकता. चिकनकारी कुर्तीसोबत हाय हील्स घातल्यामुळे स्टायलिश लूक मिळतो. जर तुम्हाला हाय हील्स आवडत नसतील तर तुम्ही मोजडी किंवा फ्लॅट हिल्सची चप्पल परिधान करू शकता. (style with High hills)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयुष कोमकर हत्या प्रकरणी आजोबा बंडू आंदेकरसह ६ जणांना अटक, मावशी अन् मावसभावांच्या मुसक्या आवळल्या; मोठे अपडेट समोर

Gold Rate Today: सोन्याचा नवा विक्रम, चांदीही चकाकली, खरेदी करण्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणावरून भुजबळांची नाराजी कायम...मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार?

11th Admission 2025 : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; विद्यार्थ्यांना बुधवारपर्यंत संधी

Solapur Municipal :'साेलापूर महापालिका निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच रद्द करा'; ज्येष्ठ नागरिकाची हरकत, सहा दिवसांत केवळ एक सूचना दाखल

SCROLL FOR NEXT