Summer Skin Care Sakal
लाइफस्टाइल

Summer Skin Care: घाम, उन्हाच्या चटक्याचा त्वचेवर परिणाम, अशी घ्या खास काळजी

Summer Skin Care: उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्यास शरीराची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

Summer Skin Care

उन्हाचा चटका वाढला असून तापमान चाळीस अंशाच्या जवळ गेले. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्याचे आव्हान असतानाच आता उन्हाळ्यामुळे घाम, उन्हाचा चटक्याचे परिमाण त्वचेवर होत आहे.

उन्हाळ्यात घामाचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्वचा ओलसर होते. जास्त घाम येत असेल तर शरीराची स्वच्छता आवश्यक असते. ती न केल्यास तेथे बुरशीजन्य आजार होतात. यासाठी संध्याकाळी अंघोळ करून त्वचा व्यवस्थित कोरडी करणे, तसेच, सुती, स्वच्छ आणि सैल कपडे वापरण्याचे पर्याय आहे. त्यानंतरही उन्हामुळे त्वचा विकार झाल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

  • उन्हाळ्यामुळे काय होत आहे?

काखेत, जांघेत घाम येऊन बुरशीजन्य आजार वाढतात

शरीरावर लालसर पुरळ येतात

अतिनील किरणांमुळे त्वचा भाजली जाते

त्वचा काळी पडते

पांढरे चट्टे दिसतात

  • का होतात त्वचाविकार?

वाढलेल्या उन्हाच्या चटक्याबरोबर प्रदूषणाचाही दुष्परिणाम त्वचेवर होतो. त्यातून त्वचा विकार वाढतात

भर उन्हाळ्यातही त्वचेला घट्ट होईल अशी जिन्स पँट घातल्याने त्वचा विकारात वाढ होते

वेगवेगळी क्रिम शरीरावर लागल्याने त्याचा दुष्परिणाम होतो

  • काय काळजी घ्यावी ?

चेहरा वारंवार धुवावा

त्वचा ओलसर ठेऊ नये

घामाचे कपडे अंगावर ठेऊ नये

जिन्सऐवजी सैल कपडे वापरावे

उन्हात फिरताना पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावे

दुचाकी चालविताना तोंडाला कपडा बांधावा

कडक उन्हात फिरणे टाळावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT