Summer Skin Care esakal
लाइफस्टाइल

Summer Skin Care : उन्हाळ्यात घामामुळे सतत खाज येते? 'या' घरगुती उपायांची घ्या मदत, मिळेल लवकर आराम

Summer Skin Care : उन्हाळ्यात शरीराला प्रचंड घाम येतो. या घामामुळे लोकांना त्वचेशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो.

Monika Lonkar –Kumbhar

Summer Skin Care : सध्या देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर, त्वचेवर आणि केसांवर ही परिणाम होतो. परंतु, आरोग्याची काळजी घेण्यासोबतच तुम्ही त्वचेकडे ही तितकेच लक्ष द्यायला हवे. उन्हाळ्यात शरीराला प्रचंड घाम येतो. या घामामुळे लोकांना त्वचेशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो.

त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे इत्यादी समस्यांचा त्यात समावेश असतो. घामामुळे सतत खाज येते, यामुळे, शरीरावर रॅशेस आणि डाग उमटतात. त्यासोबतच त्वचेची आग होते आणि वेदना होतात. या स्थितीमध्ये त्वचेच्या संसर्गामुळे खाज येते.

या खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कडक उन्हाचा संपर्क टाळायला हवा. यासोबतच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही औषधी आणि घरगुती गोष्टींचा वापर केल्याने ही तुमची खाज येण्यापासून सुटका होऊ शकेल. आज आम्ही तुम्हाला खाज येण्यापासून सुटका करण्यासाठी काही सोप्या आणि घरगुती टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्सबद्दल.

तुळस आणि कोरफड

तुळस आणि कोरफड या दोन्ही औषधी वनस्पती आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. या दोन्ही वनसप्तींचा वापर केल्याने विविध समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच त्वचा आणि केसांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात शरीराला येणारी खाज थांबवण्यासाठी तुम्ही कोरफड आणि तुळशीची मदत घेऊ शकता.

त्यासाठी, अंघोळीच्या पाण्यात तुळशीची काही पाने आणि कोरफडीचा गर मिसळा. त्यानंतर, पाणी चांगले मिसळून घ्या आणि या पाण्याने अंघोळ करा. यामुळे, बॅक्टेरिअल इन्फेक्शन दूर होईल आणि तुमची त्वचा हायड्रेटेड राहिल. तसेच, अंगावर खाज येण्याचे प्रमाण कमी होईल.

हळदीची पेस्ट

हळदीशिवाय आपले भारतीय मसाले आणि स्वयंपाक घर अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. हळदीमुळे खाद्यपदार्थांची चव वाढते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच हळद आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर आवर्जून केला जातो.

उन्हाळ्यात घामामुळे अंगाला सतत खाज येते. ही खाज दूर करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. त्यासाठी, १ चमचा हळद घ्या. त्यामध्ये थोडे दूध मिसळा. त्यानंतर, याची पेस्ट जिथे खाज येते त्या भागावर लावा. थोडवेळाने त्वचा धुवून घ्या. यामुळे, तुम्हाला खाज येण्यापासून आराम मिळेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT