nails care Esakal
लाइफस्टाइल

Sunday Special: हातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या नखांची, काळजी कशी घ्यावी ?

नेलपेन्ट अधिक काळ नखांवर राहिली तर नखे खराब होतात.

दिपाली सुसर

अनेक महिलां लांब नखे ठेवतात. नखांचे सौंदर्य वाढविण्यासाठी त्या नेलपेन्ट, नेल आर्टचा उपयोग करतात. मात्र घरातील काम करताना ही लांब वाढवलेली नखे तुटतात. यासाठी नखे मजबूत होणे आवश्यक असते. एक आठवड्यापेक्षा अधिक काळ नेलपेन्ट नखांवर ठेवू नका. नेलपेन्ट अधिक काळ नखांवर राहिली तर नखे खराब होतात. मजबूत नखांसाठी कशी काळजी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत.

कशी घ्यावी नखांची काळजी ?

1) स्वच्छता:

गरम पाणी आणि साबणाचे मिश्रण तयार करून त्यात दोन्ही हात बुडवून ठेवा काही वेळाने स्क्रबरच्या साहाय्याने नखे स्वच्छ करा.

2)अंड्याचा वापर:

अंड्याच्या आतील पिवळा भाग दुधामध्ये मिसळून त्याचे मिश्रण नखांना लावा. याने काही वेळ मालीश करा. यामुळे नखे मजबूत आणि चमकदार होतील. डायटमध्ये कॅल्शियम असणे गरजेचे आहे.

3) ऑलिव्ह ऑइल:

एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये तीन ते चार चमचे लिंबाचा रस टाका आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी नखांना लावा, यामुळे नखे मजबूत होतात.

4) नारळाचे तेल:

नारळाचे तेल कोमट करुन नखांना मालीश करा. यामुळे नखे मजबूत होतात.

5) सफरचंदाचा रस:

एक चतुर्थांश सफरचंदाच्या रसामध्ये अर्धा कप बीअर आणि ऑलिव्ह ऑइल यांचे एकत्र मिश्रण तयार करा. आता या मिश्रणामध्ये दोन्ही हातांची नखे पाच मिनिटे बुडवून ठेवा आणि बाहेर काढून नंतर मालीश करा. यामुळे नखे मजबूत होतात.

नखांची काळजी घेतांना कोणत्या गोष्टी निट लक्षात ठेवाव्यात ?

● नखांना आकार देताना क्युटीकल म्हणजेच नखांच्या सुरुवातीच्या त्वचेची काळजी घ्या. नख कापताना ते एकाच बाजूने कापावे आणि शेप देखील एकाच बाजूने द्यावा, वेगवेगळ्या जागांवरून शेप दिल्यास नखे लवकर खराब होतात.

● आठवड्यातून एकदा तरी हातांना मालिश करा, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये वाढ होण्यास मदत होते. फक्त हातांनाच नाही तर नखांनाही मालिश करणं आवश्यक असतं. त्यामुळे नखांच्या वाढिसोबतच नखं आकर्षक होण्यासही मदत होतं.

● नेल पॉलिश अधिकाधिक वेळ नखांवर टिकवून ठेवण्यासाठी नेल पॉलिश लावल्यानंतर ती व्यवस्थित सुकू द्या. त्यानंतर बर्फाच्या पाण्यामध्ये 30 सेकंदांसाठी ठेवा.

● नेल पॉलिश जेव्हा नखांवरून निघू लागेल त्यावेळी टचअप न करता. नेलपेंट रिम्हूवर वापरून ती काढून टाका आणि पुन्हा नेटपेंट नव्याने लावा. त्याच नेलपेंटवर टचअप केल्याने नखांचा लूक बिघडू शकतो.

● लांब नखांच्या सुरक्षेसाठी बाजारात प्लास्टिकची कॅप मिळते, त्याचा उपयोग करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर कच्चे तेल महागले; आता पेट्रोल-डिझेल कितीला? महाराष्ट्रातील शहरनिहाय नवे दर जाहीर

Shaktipeeth Highway Drone Survey : ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी विठ्यात ‘ड्रोन सर्व्हे’, शेतकऱ्यांनी प्रशासनाला दाखवला हिसका; सांगलीत वातावरण तापलं

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ' प्रशासक नियुक्तीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर आज सुनावणी

Pakistan Occupied Kashmir: पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणाव शिगेला; धुमश्‍चक्रीत ११ जणांचा मृत्यू, ब्रिटिश खासदारांकडून चिंता व्यक्त

Maharashtra Education : चौथीच्या पुस्तकात मोठा बदल! छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबतच जोडले 'हे' खास पान; संत, थोर समाजपुरुषांच्या कार्यांची विद्यार्थ्यांना होणार ओळख

SCROLL FOR NEXT