There are some special things to keep in mind before learning online 
लाइफस्टाइल

ऑनलाइन शिक्षण घेण्यापूर्वी या गोष्टींची घ्या विशेष काळजी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : यावर्षी जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला होता. या वाढत्या कोरोनामुळे जवळजवळ अनेकजण घरी बसून ऑनलाइन अभ्यास करीत आहे किंवा काहीजण काम करीत आहे. कोरोना साथीमुळे जवळजवळ संपूर्ण जग ऑनलाइन मार्गावर काम करत आहे. कोरोनामुळे शाळा आणि ट्यूशनद्वारे शिक्षक ऑनलाईन क्लास घेत आहेत. आजही काही तरुणाई ऑनलाईन शिकण्याने उत्साही आहेत तर काही निरुत्साही आहेत. तुम्हीसुद्धा ऑनलाईन शिक्षणासाठी जात असाल तर जाण्यापूर्वी तुम्हाला काही खास गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या लेखात काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही ऑनलाइन शिक्षण चांगले बनवू शकता. चला तर मग त्या विशेष गोष्टी जाणून घेऊया.

ऑनलाइन शिक्षण घेण्यापूर्वी तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्याविषयी नेटवर सर्च करा. जर तुम्हाला शक्य असल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना या विषयात ऑनलाइन शिक्षण घेऊ शकाल की नाही हे देखील विचारा. तुम्ही तयार असेल तरच एखाद्या विषयासाठी ऑनलाइन शिक्षणासाठी जावा.

कोरोना विषाणूमुळे ऑनलाइन कोर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच ऑनलाइन शिक्षणाद्वारे मुलांना भुरळ घालण्याची ऑफर येत असतात, अशा प्रकारे तुम्ही अचूक माहिती घेतल्यानंतरच ऑनलाइन लर्निंग क्लासमध्ये जॉइन करा. काही संस्थेच्या पूर्ण माहितीबद्दल माहिती दिल्यानंतरच इंटरनेटवर जावा.

आजकाल बरेच ऑनलाइन क्लास ऑनलाइन लर्निंगसाठी विविध प्रकारच्या वैयक्तिक माहिती विचारतात. अशा परिस्थितीत तुम्ही खाजगी माहिती देणे टाळा. म्हणजे अकाउंट नंबर, पासवर्ड इ. कोणाबरोबरही कधीही शेअर करू नका. तुम्ही ज्या ऑनलाइन संस्थेस ऑनलाईन लर्निंगसाठी जाणार आहात. त्यावेळी त्या इतर संस्थेची तुलना करा. कोण सर्वोत्कृष्ट आहे आणि कोण नाही हे माहित असलेच पाहिजे. तुम्हाला कोर्स योग्यरित्या कोण शिकवू शकतो आणि कोण नाही याची फी सोबत तुलना करा.

संपादन : सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT