Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : दिवसाची सुरुवात चहा-कॉफीने करण्याऐवजी कोमट पाण्याने करा, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय खाता किंवा पिता? याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेक जण आपल्या दिवसाची सुरूवात चहा-कॉफीने करतात. हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय खाता किंवा पिता? याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेक जण आपल्या दिवसाची सुरूवात चहा-कॉफीने करतात. हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

त्याऐवजी जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी २-३ ग्लास कोमट पाणी प्यायले तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यामुळे, आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात सकाळी चहा-कॉफीच्या ऐवजी कोमट पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते?

शरीर होते डिटॉक्स

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यामुळे, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. असे केल्याने आपल्या आतड्यांमध्ये अडकलेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

तसेच, आपली पचनक्रिया सुरळीत राहते. या कोमट पाण्याला उत्तम डिटॉक्स ड्रिंक्स बनवण्यासाठी तुम्ही त्यात लिंबू आणि मध घालून पिऊ शकता. यामुळे आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि शरीर डिटॉक्स होते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे तुम्ही त्रस्त असाल, तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे हा त्यावर रामबाण उपाय ठरू शकतो. सकाळी चहा किंवा कॉफी पिणे शक्यतो टाळा.

त्याऐवजी सकाळी १ ग्लास कोमट पाणी पिण्यास सुरूवात करा. यामुळे, तुमची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल त्यासोबतच तुमचे वजन देखील कमी होईल. शिवाय, शरीराची चयापचय क्रिया देखील सुरळीत राहील.

कफची समस्या दूर होईल

आपल्या आसपासचे वातावरण बदलले की, लगेच सर्दी-खोकल्याची समस्या सुरू होते. खास करून थंडीच्या दिवसांमध्ये या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. विशेष करून लहान मुले किंवा वयोवृद्धांना या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतात.

अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सकाळी कोमट पाणी प्यायले तर तुमची सर्दी-खोकल्याची समस्या दूर होऊ शकते. यासोबतच तुम्ही कोमट पाण्यात मीठ  आणि चिमूटभर हळद मिसळून सकाळी गुळण्या करू शकता. यामुळे, तुमच्या घशाला आराम मिळेल आणि कफची समस्येपासून सुटका मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

IND vs PAK Asia Cup Final : भारत-पाकिस्तान, हे आशिया चषक जेतेपदासाठी भिडणार! पण हा सामना केव्हा, कुठे, किती वाजता Live पाहता येणार? कोणतं चॅनेल?

Maharashtra Milk Rates: कर्नाटकात दूध उत्पादकांना प्रतिलिटर ७ रुपये जादा; महाराष्ट्रातही दूध दरवाढ होणार का? पुण्यात आज बैठक

Latest Marathi News Live Update : स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर अजूनही अव्वल; गुणपत्रिका जाहीर होऊ द्या: महापौर

Akkalkot Fire: अक्कलकोटमध्ये सात ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी; अडीच ते तीन कोटींचे नुकसान, चालकांच्या प्रसंगावधानाने २० वाहने वाचली

SCROLL FOR NEXT