Travel Diaries esakal
लाइफस्टाइल

Travel Diaries : ट्रेकिंगची आवड आहे? मग, भारतातील ‘या’ ठिकाणांना एकदा नक्की द्या भेट

ज्या लोकांना निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडते आणि ज्यांना साहसाची आवड आहे. अशा लोकांसाठी ट्रेकिंग हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. अनेकांना ट्रेकिंग करायला प्रचंड आवडते.

Monika Lonkar –Kumbhar

Travel Diaries : ज्या लोकांना निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडते आणि ज्यांना साहसाची आवड आहे. अशा लोकांसाठी ट्रेकिंग हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. अनेकांना ट्रेकिंग करायला प्रचंड आवडते. भारतात ट्रेकिंग प्रेमींची काही कमी नाही. ट्रेकिंग केल्याने आपला शारिरीक व्यायाम होतो. यासोबतच आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला मिळतो.

काही जण निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी आणि ते जवळून अनुभवण्यासाठी ट्रेकिंग करतात. जर तुम्हाला ही ट्रेकिंगचा छंद असेल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील काही ट्रेकिंगसाठी बेस्ट असणाऱ्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

गोमुख तपोवन ट्रेक

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात हा गोमुख तपोवन ट्रेक स्थित आहे. हे एक उत्कृष्ट ट्रेकिंग ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला शंभू महादेवाच्या भव्य शिवलिंगाचे शिखर पाहण्याची संधी मिळते. जर तुम्हाला हिमालय पर्वत पहायचा असेल तर, गोमुख तपोवन ट्रेक हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ट्रेक

उत्तराखंड राज्यातील हा प्रसिद्ध ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ट्रेक’ ट्रेकर्सचे आवडीचे ठिकाण आहे. देश-विदेशातील अनेक उत्साही पर्यटक आणि ट्रेकर्स या ठिकाणी भेट द्यायला येतात. या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ट्रेकचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे, या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक भेट देण्यासाठी येतात. येथील निसर्गसौंदर्य पाहणे आणि या वातावरणात ट्रेकिंग करणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. तुम्ही जर या ठिकाणी कधी गेला नसाल तर अवश्य जा.

व्यास कुंड ट्रेक

मनालीमध्ये स्थित असलेला हा बियास कुंड ट्रेक अनेकांच्या आवडीचा आहे. ट्रेकिंगसाठी हा ट्रेक सर्वाधिक प्रसिद्ध आहे. मनालीला गेल्यानंतर अनेक जण व्यास कुंड ट्रेकला आवर्जून जातात. या व्यास कुंडच्या ट्रेकिंगला गेल्यानंतर तलाव आणि त्याच्या सभोवतालचे नयनरम्य दृश्ये आपल्याला पहायला मिळतात. हा नजारा आपण कधीच विसरू शकत नाही. या ठिकाणी ट्रेकिंगला नक्की जा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा बदल? पेन्शनधारकांना मिळू शकते ४५ हजारांची किमान पेन्शन

Pune Stunt Video : पुण्यात परप्रांतीय तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा, दारूच्या नशेत भरधाव कारमधून जीवघेणी स्टंटबाजी अन्... व्हिडिओ व्हायरल

CIDCO Housing Lottery: स्वातंत्र्य दिनानिमित्त ४,७७९ घरांची लॉटरी सिडकोची 'ईडब्ल्यूएस'साठी संधी

Hardik Pandya Trade: मोठा ट्विस्ट! Mumbai Indians च्या हार्दिकला पुन्हा गुजरात टायटन्सकडे जायचंय, कर्णधार व्हायचंय; शुभमन गिलचं काय होणार?

Marathi News Live Updates : श्रावणात त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन बंद

SCROLL FOR NEXT