Baking Soda Side effects esakal
लाइफस्टाइल

Baking Soda Side effects : चेहऱ्यावर बेकिंग सोडा लावताय? मग, वापर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

चेहऱ्याचे स्क्रबिंग करण्यासाठी अनेक जण बेकिंग सोड्याचा वापर करतात. जे आपल्या त्वचेसाठी चांगले एक्सफोलिएट आहे. परंतु, जर तुम्ही ते थेट त्वचेवर लावले, तर याचे नुकसान देखील त्वचेला होऊ शकते.

Monika Lonkar –Kumbhar

Baking Soda Side effects : अनेक जण त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ करण्यासाठी विविध उपाय करतात. यामध्ये काही घरगुती उपाय आणि काही केमिकल्सनेयुक्त असलेल्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो.

खर तर त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे स्क्रब्स मिळतील. परंतु, हे सर्व प्रॉडक्ट्स केमिकल बेस्ड आहेत. त्यामुळे, या प्रॉडक्ट्सचा तात्पुरता फायदा आपल्याला मिळतो. मात्र, हे फायदे कायमस्वरूपी नसतात. त्यामुळे, त्याचे दुष्परिणाम ही होऊ शकतात.

चेहऱ्याचे स्क्रबिंग करण्यासाठी अनेक जण बेकिंग सोड्याचा वापर करतात. मात्र, बेकिंग सोड्यामध्ये फक्त सोडिअम बायकार्बोनेट असते. जे आपल्या त्वचेसाठी चांगले एक्सफोलिएट आहे. परंतु, जर तुम्ही ते थेट त्वचेवर लावले तर याचे नुकसान देखील त्वचेला होऊ शकते. आज आपण बेकिंग सोडा त्वचेला लावल्यानंतर त्वचेचे काय नुकसान होऊ शकते? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

त्वचा कोरडी पडू शकते

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर, त्वचेवर बेकिंग सोड्याचा वापर करणे टाळा. कारण, यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी पडू शकते. तसेच, यामुळे तुमच्या त्वचेवर पांढरे डाग पडू शकतात.

जर तुम्हाला कोरड्या त्वचेवर बेकिंग सोड्याचा वापर करायचा असेल तर, तो थेट न करता तुम्ही कोरफड जेलच्या मदतीने करू शकता. यासाठी कोरफड जेलमध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि २ मिनिटे चेहऱ्याचे स्क्रब करा. मात्र, बेकिंग सोडा त्वचेवर थेट लावण्याचे टाळा. अन्यथा तुम्हाला त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

त्वचेवर रॅशेज येऊ शकतात

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर, तुम्ही तुमच्या त्वचेवर बेकिंग सोडा थेट लावणे टाळायला हवे. त्वचेसाठी बेकिंग सोड्याचा वापर बिलकुल करू नका. जर तुम्ही याचा वापर त्वचेवर केला तर तुमच्या त्वचेवर लाल रॅशेस, फोड किंवा लाल चकत्या येऊ शकतात.

या रॅशेजमुळे तुम्हाला त्वचेवर खाज आणि जळजळ देखील येऊ शकते. त्यामुळे, त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी चेहऱ्यावर थेटपणे बेकिंग सोड्याचा वापर करणे टाळा. अन्यथा त्वचेचे नुकसान होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT