afternoon sleep esakal
लाइफस्टाइल

दुपारी बिनधास्त झोपाच! होतील फायदे

काहींना दुपारी झोप काढल्याशिवाय चैन पडत नाही

सकाळ डिजिटल टीम

सकाळी (morning)लवकर उठून स्वयंपाक, मुलांची शाळा, डबा, जीम, अशी सगळी काम झाली की महिलांना (womens)हायसं वाटतं. मग त्यांना थोडावेळ तरी डुलकी (sleep) काढाविशी वाटते. फक्त महिलाच नाही तर अनेक पुरूषांनाही (man) दुपारी थोडावेळ तरी झोपावं असं वाटतं. मोठमोठ्या आयटी कंपनीत थोडावेळ झोपण्यासाठी खास रूम्स असतात. तेथे तुम्ही थोडावेळ झोप घेऊ शकता. या संधीचा फायदा अनेकजण घेतात. तुम्ही दिवसा काम करून थकलेले असता तेव्हा दुपारची थोडावेळा का होईना झोप फायद्याची ठरते. काहीजण दुपारी अजिबात झोपत नाहीत. तर काहींना झोप काढल्याशिवाय चैन पडत नाही. पण, दुपारी झोप घेतल्याने तुम्ही आळशी होत नाही. तर त्याचा फायदाच होतो.

जर्नल ऑफ जनरल सायकियाट्री या वैद्यकीय नियतकालिकामध्ये दुपारी झोपल्याने काय फायदे होऊ शकतात याविषयी सांगितले आहे. त्यात काही मुद्दे सांगितले आहेत.

१) दुपारी १ ते ३ च्या दरम्यान फक्त ३० मिनिटं झोप घेणे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे असते.

२) दुपारी ६० मिनीट झोपलो असताना आपण झोपण्याआधी शिकलेल्या ताज्या गोष्टीं स्मृतीत राहून त्या मेंदूत साठवल्या जातात.

३) तुमच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते.

४) दुपारी झोपल्यानंतर मन आनंदी होतं. कामात उत्साह येतो.मानसिक-शारिरिक ताण कमी होतो.

५) दुपारी ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपल्यास मात्र रात्री झोपायला उशीर होऊन तुमचे स्लीप रूटीन बिघडू शकते.

power nap

पॉवर नॅपही घेता येईल

२० मिनिटांची पॉवर नॅप घेतली तर शरीरात हॅप्पी हार्मोन्सचं संतुलन चांगलं राहतं, असं आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितले आहे. पण पॉवर नॅप घेताना गादीवर झोपल्यास तुम्हाला गाढ झोप लागू शकते. त्यापेक्षा उशी पाठीला लावून डोळे बंद करून नॅप घ्या. तसंच खुर्ची, कोच, डायनिंग टेबल कुठेही बसून तुम्ही ही नॅप घेउ शकता, पण २० मिनिटांचा गजर लावायला विसरू नका. अशी नॅप घेतल्यामुळे तुम्हाला हृदयविकार, कर्करोग, रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका कमी होतो. तुमची स्मरणशक्ती चांगली राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT