Home Remedies for Pimples esakal
लाइफस्टाइल

Home Remedies for Pimples : चेहऱ्यावरील पिंपल्समुळे त्रस्त आहात? कडुलिंब आहे मदतीला! जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

धूळ आणि प्रदूषणाचा त्वचेवर गंभीर परिणाम होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Pimples Care Tips : धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर पुरळ येण्याची समस्या वाढते. या सोबतच त्वचा तेलकट व्हायला सुरूवात होते. त्वचेवर धूळ आणि प्रदूषणाचा गंभीर परिणाम होतो. त्वचा निस्तेज दिसू लागते आणि त्वचेच्या अनेक समस्यांना आमंत्रण दिले जाते.

या सोबतच चेहऱ्यावर पुरळ येण्याची इतर अनेक कारणे असू शकतात. अयोग्य आहार, बिघडलेली जीवनशैली, स्किनकेअरचा अभाव इत्यादी अनेक कारणे यामागे असू शकतात.

मात्र, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, आज आम्ही पिंपल्स किंवा पुरळ येण्याच्या समस्येवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. कोणते आहेत हे घरगुती उपाय ? चला तर मग जाणून घेऊयात.

कडुलिंब

कडुलिंबामध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅटीऑक्सिडंन्ट्स आणि अ‍ॅटीबॅक्टेरिअल गुणधर्मांचा समावेश आढळून येतो. यासोबतच व्हिटॅमिन्स आणि कॅल्शिअमचे मुबलक प्रमाण कडुलिंबामध्ये आढळून येते. कडुलिंब त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.

पुरळ किंवा पिंपल्सच्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाची काही पाने घ्या. एका भांड्यात कडुलिंबाची पाने घालून त्यात पाणी घाला. ते चांगले उकळून घ्या. थंड झाल्यावर ते तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी त्या पानांची पेस्ट करून पिंपल्सवर लावा. २०-२५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

गुलाबजल

त्वचेच्या अनेक समस्यांवर गुलाबजल फायदेशीर आहे. गुलाबजलचा उपयोग अनेक फेसपॅक्समध्ये आवर्जून केला जातो. तसेच, घरगुती उपायांमध्ये ही त्याचा वापर केल जातो. गुलाबजल त्वचेवर टोनरप्रमाणे काम करते.

पिंपल्सवर गुलाबजलाचा उपाय करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे गुलाबजल घ्या. त्यात २-३ थेंब टी ट्री ऑईल घालून एकत्रित मिसळा. आता कॉटनच्या मदतीने पिंपल्सवर हे मिश्रण लावा. नियमितपणे याचा वापर केल्यास पुरळांची समस्या लवकरच दूर होईल.

हळद

हळद ही आपल्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. यासोबतच त्वचेसाठी हळद अतिशय फायदेशीर आहे. हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंन्ट्सचा समावेश असतो. हे गुणधर्म चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यास मदत करतात. पुरळसोबतच चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी हळद फायदेशीर ठरते.

हळदीचा वापर करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे हळद घ्या. त्यामध्ये १ चमचा मध मिक्स करा. आता त्यात २-३ चमचे एरंडेल तेल मिसळा. हे सर्व मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान २ वेळा हा उपाय करा. पिंपल्सची समस्या लवकर दूर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT