Hair Care Tips  esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : केसांचा फ्रिझीनेसपणा कमी करण्यासाठी 'या' नैसर्गिक तेलांचा करा वापर

थंडीमध्ये त्वचेसोबतच केसांची ही खास काळजी घ्यावी लागते.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : वातावरणात बदल झाले की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, त्वचेवर आणि केसांवर ही होऊ लागतो. नुकतीच कडाक्याच्या थंडीला सुरूवात झाली आहे. थंडीमध्ये त्वचेसोबतच केसांची ही खास काळजी घ्यावी लागते. वातावरणातील बदलामुळे केसांवर ही याचा परिणाम होतो.

थंड वातावरणामुळे केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे, या दिवसांमध्ये केसांचा फ्रिझीनेसपणा देखील वाढतो. फ्रिझीनेसपणा वाढला की केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात.

त्यामुळे, ही समस्या टाळण्यासाठी विविध प्रकारचे शॅंम्पू आणि हेअर सीरम्सचा वापर केला जातो. मात्र, केसांचा फ्रिझीनेसपणा कमी करण्यासाठी आपण काही नैसर्गिक तेलांचा ही वापर करू शकतो.

या तेलांचा वापर केल्याने केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते. शिवाय, केसांमधील फ्रिझीनेसपणा ही कमी होतो. केसांमधील हा फ्रिझीनेसपणा कमी करणाऱ्या तेलांबद्दल आपण जाणून घेऊयात.

नारळाचे तेल

नारळाच्या तेलामध्ये मॉईश्चरायझिंग गुणधर्म भरपूर असतात. या तेलाने केसांचा मसाज केल्याने केसांमधील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. तसेच, केसांचा पोत मजबूत होतो आणि केसांशी संबंधित इतर समस्या दूर होतात.

केस धुण्यापूर्वी ३० मिनिटे आधी या खोबरेल तेलाने केसांचा छान मसाज करा. त्यानंतर, केस धुवा. त्यामुळे, केस मऊ आणि चमकदार होतील तसेच, केसांमधील फ्रिझीनेसपणा कमी होईल. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २-३ वेळा या तेलाने केसांचा मसाज करा.

बदामाचे तेल

केसांमधील वाढलेला कोरडेपणा आणि फ्रिझीनेसपणा कमी करण्यासाठी बदामाचे तेल फायदेशीर आहे. या तेलामध्ये आढळून येणाऱ्या पोषकतत्वांमुळे केसांमधील फ्रिझीनेसपणा दूर होण्यास मदत होते. तसेच, केसांची चांगल्या प्रकारे वाढ होते.

या तेलाने आठवड्यातून ३ वेळा केसांचा मसाज करा. तसेच, केस धुतल्यानंतर आफ्टर वॉश हेअर सीरम म्हणूनही तुम्ही या तेलाचा वापर करू शकता.

टी ट्री ऑईल

केसांमधील वाढत्या कोरडेपणामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या ही वाढू शकते. त्यामुळे, केसांचा हा कोरडेपणा आणि फ्रिझीनेसपणा कमी करण्यासाठी टी ट्री ऑईलचा अवश्य वापर करा. या तेलाचा वापर केल्याने केसांची छान वाढ होते आणि केसांचा फ्रिझीनेसपणा कमी होतो.

शिवाय, अनेक प्रकारच्या संसर्गांपासून हे तेल केसांचे आणि स्काल्पचे संरक्षण करते. आठवड्यातून २-३ वेळा या तेलाने केसांचा छान मसाज करा, त्यानंतर केस धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT