Irregular Periods sakal
लाइफस्टाइल

Irregular Periods: मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळवून देतील ‘हे’ पदार्थ! वेदना होतील कमी

अनियमित पीरियड्सची समस्या दूर करतील हे पदार्थ.

Aishwarya Musale

तुम्हालाही मासिक पाळी दरम्यान वेदना जाणवतात का? मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी जीवनशैली बदलणे, व्यायाम करणे आणि चांगला आहार घेणे आवश्यक आहे. पण, काही सुपरफूड्सही यात तुम्हाला मदत करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 सुपरफूड्सबद्दल सांगत आहोत, जे तुम्हाला वेदना कमी करून आराम देतात.

मासिक पाळी दरम्यान वेदना का होतात?

तज्ञ म्हणतात, “सामान्यत: मासिक पाळीत वेदना प्रोस्टॅग्लॅंडिनच्या वाढीमुळे होते. हे केमिकल्‍स तुमच्या गर्भाशयात तयार होतात आणि या भागातील स्नायूंना टाइट व आराम देतात आणि त्यामुळे पेटके येतात.

1. मासिक पाळीच्या वेदनांसाठी केशर

हे थोडे महाग असले तरी जेवणात रंग आणि चव जोडण्यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. केशर दाहक-विरोधी आणि अँटी-स्पास्मोडिक आहे. आहारात याचा समावेश केल्याने गर्भाशयाच्या स्नायूंना आराम मिळतो, ज्यामुळे पीरियड क्रॅम्प्स कमी होतात.

याशिवाय केशर सेरोटोनिन हार्मोन वाढवते, जे पीरियड्स दरम्यान मूड स्विंग नियंत्रित करण्यास मदत करते.

दुधात केशराचे २ धागे टाकून रात्री प्यावे. हवे असल्यास रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या.

2. मासिक पाळीच्या वेदनांसाठी काळे मनुके

हे रक्त शुद्ध करते आणि मासिक पाळी दरम्यान फ्लो करण्यास मदत करते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान वेदना होतात. अशा महिलांनी आपल्या आहारात काळ्या मनुका समाविष्ट कराव्यात.

3-4 भिजवलेले काळे मनुके सकाळी रिकाम्या पोटी खा.

3. मासिक पाळीच्या वेदनांसाठी तूप

अनेक महिलांना वाटतं की तूप खाल्ल्याने वजन वाढेल. परंतु, मर्यादित प्रमाणात शुद्ध तुपाचे सेवन केल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात. तूप केवळ मासिक पाळीच्या वेळी मळमळ आणि क्रॅम्पपासून आराम देते, परंतु आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी देखील चांगले आहे.

दुपारचे जेवण शुद्ध देशी तुपात बनवा.

4. मासिक पाळीच्या वेदनांसाठी काजू

प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, लोह, जस्त या पोषक घटकांमुळे काजूला एनर्जीचे पावर हाउस म्हटले जाते. मर्यादित प्रमाणात काजू खाल्ल्याने आरोग्य चांगले ठेवता येते. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम भरपूर असते, ज्यामुळे पीरियड क्रॅम्प्स कमी होतात.

सकाळी 2-3 भिजवलेले काजू खा.

5. मासिक पाळीच्या वेदनांसाठी गूळ

गूळ खाल्ल्याने एंडोर्फिन बाहेर पडतात आणि क्रॅम्प्स कमी होतात. याशिवाय, मासिक पाळी दरम्यान शुगर क्रेविंगला देखील प्रतिबंधित करते.

दुपारच्या जेवणानंतर गुळाचा १ छोटा तुकडा खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT