JN.1 Covid esakal
लाइफस्टाइल

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला दूर ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स; वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हॅरिएंटने आता पुन्हा डोके वर काढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Monika Lonkar –Kumbhar

JN.1 Covid : मागील २-३ वर्षांपासून कोरोना या महामारीने जगभरात हाहाकार माजवून दिला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला जरी कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी त्याची अनेक रूपे आपल्याला पहायला मिळाली.

आपण आता कोरोनामुक्त झालो आहोत, असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटने जगभरात धूमाकूळ घातला आहे. ज्या देशातून कोरोनाची सुरूवात झाली, त्याच चीनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 आढळून आला. चीननंतर अमेरिका, युके, फ्रान्स, आईसलॅंड आणि आता भारतातही या व्हेरिएंटची प्रकरणे आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

भारतातील केरळ राज्यात व्हेरिएंटची अनेक प्रकरणे आढळून आली असून केरळमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील आरोग्य यंत्रणा देखील सक्रिय झाली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंट JN.1 ला दूर ठेवण्यासाठी आपण आहाराची खास काळजी घेणे गरजेचे आहे असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आपण रोगप्रतिकारक शक्तीवर जास्त लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यासाठी, कॅलरीज, व्हिटॅमिन्स आणि डिटॉक्सीफिकेशनवर लक्ष देऊन कोरोनाचा संसर्ग कमी केला जाऊ शकतो. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता.

व्हिटॅमिन्स

निरोगी आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन्सचा समावेश करणे गरजेचे आहे. खास करून व्हिटॅमिन डी, व्हिटॅमनिन बी6 आणि झिंक इत्यादी घटकांनी युक्त असलेले खाद्यपदार्थ आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

व्हिटॅमिन डीमुळे आपल्या शरीरातील कॅल्शिअम, फॉस्फरस आणि रक्तपातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते. त्यामुळे, श्वसनाच्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळण्यास मदत होते.

कॅलरीज

आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कॅलरीज उपयुक्त ठरतात. यासाठी विविध प्रकारच्या व्हिटॅमिन्स आणि खनिजांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. यामुळे, शरीराला उपयुक्त कॅलरीज मिळतील आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होईल.

उपयुक्त कॅलरीजसाठी तुम्ही आहारात साखर, गूळ, फळे, फळांचे ज्यूस, तूप आणि कर्बोदकांचा आहारात समावेश करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT