Gardening Tips esakal
लाइफस्टाइल

Gardening Tips : हिवाळ्यात झाडे कोमेजून जातात? मग, बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी

थंडीमुळे आणि पहाटेच्या धुक्यामुळे झाडे कोमेजून जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Gardening Tips : वातावरणात बदल झाले की याचा आपल्या आरोग्यावर लगेच परिणाम होतो. त्यामुळे, हिवाळ्यात आपण आपल्या आरोग्याची खास काळजी घेतो. मात्र, वातावरणातील या बदलाचा, या थंडाव्याचा झाडांवरही विपरीत परिणाम होतो.

अंगणातील झाडे असुदे किंवा तुमचे इनडोअर प्लॅंट्स असुदे या दोन्ही प्रकारच्या झाडांवर या थंडीचा परिणाम होतो. या थंडाव्यामुळे आणि पहाटेच्या धुक्यामुळे झाडे कोमेजून जातात. या थंड वातावरणाचा फटका इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही प्रकारातील झाडांना बसतो.

त्यामुळे, झाडे कोमेजून जातात किंवा झाडे सुकायला लागतात. त्यामुळे, या थंडीच्या दिवसांमध्ये झाडांची खास काळजी घेणे महत्वाचे आहे. अन्यथा झाडांचे खूप नुकसान होऊ शकते.

झाडांना पाणी घाला

वातावरणातील तापमान कमी झाले की, जमिन गोठण्यास सुरूवात होते. त्यामुळे, ही जमिन गोठण्यापूर्वी तुमच्या झाडांना पुरेसे पाणी द्या. यामुळे, झाडे हायड्रेटेड राहण्यास मदत होईल. जेव्हा तुमचे झाड हायड्रेटेड राहिल तेव्हा वातावरणातील तापमान आणि बदलांचा सामना करण्यास ते अधिक सक्षम होतील.

परंतु, या काळात तुम्हाला झाडांची थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. या काळात झाडांना खूप जास्त पाणी घालू नका, प्रमाणात पाणी घाला. अन्यथा जास्त पाण्यामुळे, झाडे कुजून जातील. त्यामुळे, झाडांना प्रमाणात पाणी घाला.

झाडांच्या कुंड्या हलवा

जर तुमच्या घराच्या अंगणात किंवा बागेतील झाडे कुंड्यांमध्ये लावलेली असतील तर थंडीपासून झाडांचा बचाव करण्यासाठी तुम्ही या कुंड्या हलवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या घरामध्ये, बाल्कनीमध्ये किंवा एखाद्या सुरक्षित स्थळी या झाडांच्या कुंड्या हलवू शकता. जेणेकरून झाडांचा थंडीपासून बचाव होऊ शकेल.

अँटी-डेसिकेंट स्प्रेचा करा वापर

जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा बागेत सदाबहार रोपे लावली असतील तर त्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही अँटी-डेसिकेंट स्प्रेचा वापर करू शकता.

या स्प्रेचा झाडांवर वापर केल्याने झाडांच्या पानांवर पातळ संरक्षणात्मक थर तयार होतो. त्यामुळे, झाडांमधील ओलावा कमी होतो आणि झाडाचे योग्य संरक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे, झाडांचा थंडीपासून बचाव होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT