yogasan 
लाइफस्टाइल

Yogasan : तुमच्या मुलाची उंची वाढत नाही का? 'हे' योग प्रकार ट्राय करा फरक दिसेल

रोजचा दैनंदिन आहार आणि काही पोषक घटक तो खात आहे का याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही तुमच्या मुलाच्या उंचीसंदर्भात काळजी करत असाल तर यावर एक उपाय आहे. तुमच्या मुलाची उंची चांगली व्हावी असेल असे वाटत असेल तर त्याच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोजचा दैनंदिन आहार आणि काही पोषक घटक तो खात आहे का याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अशावेळी त्यांच्या काही शारीरिक हालचालींवर विशेष लक्षही द्यावे लागेल.

अशावेळी तुम्ही त्याच्या दैनंदिन खाण्यातील दिनचर्येत काही बदल करु शकता. तसेच यावर एक सर्वोत्तम उपाय म्हणून तुम्ही त्याला काही योगासनांची सवय लावू शकता. अनेकवेळा एखाद्याची उंची ही अनुवांशिकता यावर आधारित असू शकते. 2 वर्षांच्या वयानंतर मुलांची उंची दरवर्षी 2.5 इंचाने वाढते. जेव्हा मुलांमध्ये तारुण्य येते तेव्हा त्यांची उंची अधिक वेगाने वाढते. आणि मुलींची उंची वाढणे खुंटायला सुरु होते. सर्व वयोगटातील लोकांनी योगा करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे योगासन करणे हे जीवनशैलीत समावेश केला पाहिजे. योगाद्वारे उंची वाढवण्याचे गुणधर्म आज आपण जाणून घेणार आहोत...

एकपादासन योग

जर तुम्हाला तुमच्या मुलाची उंची चांगली असावी किंवा वाढावी असे वाटत असेल तर त्याला रोज एकापदासन हा योग प्रकार करायला सांगा. यासाठी सुरुवातील सरळ उभे राहणे गरजेचे आहे. यानंतर तुमचा उजवा पाय उचलून स्नायू आणि पाठीचा कणा मजबूत होईल. यासाठी सुरुवातील सरळ उभे राहा. तुमचा उजवा पाय उचला आणि डाव्या मांडीला हलवत रहा. यानंतर डाव्या पायावर शरीराचे वजन संतुलित ठेवा. उजवा पाय तुमच्या ओटीपोटाच्या जवळ ठेवा. त्यानंतर तुमचे दोन्ही हात वरच्या बाजूला जोडून तुम्हाला सूर्यनमस्काराच्या आसनात उभे राहावे लागेल.

ताडासन

हा आसन प्रकार करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहावे. मग आपले पाय एकत्र करून यानंतर दोन्ही हात बाजूला ठेवावे लागतील. मग आपले तळवे वर करून यानंतर श्वास घेताना दोन्ही बोटांच्या बळावर उभे राहून शरीराला वर खेचावे. मग सामान्य स्थितीत या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT