लाइफस्टाइल

Beauty Tips : भुवयांची वाढ खूप हळू होतेय का? मग ट्राय करा हे घरगुती उपाय आणि पाहा परिणाम

भुवयांची वाढ खूप हळू होतेय का? मग ट्राय करा हे घरगुती उपाय

Aishwarya Musale

जाड भुवया चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. आपल्यापैकी अनेकांच्या भुवया फार जाड नसतात. कोणाच्या भुवयांचे केस हे जाड, भरीव असतात तर काही जणांच्या भुवया या अगदीच पातळ असतात. परंतु आपल्या भुवया जेवढ्या जाड व भरीव असतील तेवढ्याच त्या दिसायला अतिशय सुंदर दिसतात.

भुवयांचे केस जाड, भरीव असलयाने आपण त्यांना हवा तसा आकार देऊ शकतो. आयब्रोचे सौंदर्य वाढवण्यासाठी काहीजणी पार्लरमध्ये जातात तर काही तरुणी आयब्रो पेन्सिलचा वापर करतात. पण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसा खर्च करण्याऐवजी घरगुती उपाय करूनही आपण आपले आयब्रो नैसर्गिक पद्धतीने जाड करू शकतो.

दूध

भुवया जाड व दाट करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करू शकता, परंतु यासाठी तुम्ही कच्चे दूध वापरावे. यामध्ये अनेक प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॅटी ॲसिड असतात, यामुळे भुवयांच्या केसांची वाढ होते.

काय करावे : कापसाच्या साहाय्याने भुवयांवर कच्चे दूध लावा आणि आठवडाभर असे करा. अशा प्रकारे भुवयांवर कच्चे दूध वापरल्याने काही दिवसांतच केसांची वाढ होऊ शकते. झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय करून पाहू शकता.

अंडी

भुवया जाड व दाट करण्यासाठी अंड्याचा आतील भाग देखील वापरता येतो. अंड्यातील पिवळ बलकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात ज्यामुळे भुवयांची वाढ होण्यास मदत होते. यासोबतच अंड्यातील पिवळ बलक वापरल्याने भुवया सिल्की होतील.

काय करावे: अंड्यातील पिवळ बलक फेटून भुवयांना आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा आणि कोरडे झाल्यानंतर अर्ध्या तासाने धुवा.

ग्रीन टी

ग्रीन टी च्या मदतीने देखील आपण भुवयांना जाड व भरीवपणा देऊ शकतो. यासाठी ग्रीन टी बनवा आणि थंड करा, नंतर कापसाच्या मदतीने भुवयांवर लावा. वीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट घटक भुवयांच्या केसांची वाढ सुधारण्यात चांगली भूमिका बजावू शकतात.

एलोवेरा जेल

भुवया भरीव बनवण्यासाठी आपण त्यावर एलोवेरा जेलही लावू शकता. यासाठी ४ ते ५ मिनिटे या जेलने भुवयांना मसाज करावा. अर्ध्या तासानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. जर आपल्याकडे ताज्या कोरफडीचा गर नसेल तर आपण बाजारात विकत मिळणाऱ्या एलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT