April Travel Places esakal
लाइफस्टाइल

April Travel Places : कडक उन्हाळ्यात थंडावा हवाय? मग, ‘या’ ठिकाणी फिरायला जाण्याचा करा प्लॅन

April Travel Places : मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्याला सुरूवात होते. त्यानंतर, हा उन्हाळा एप्रिलमध्ये जास्त वाढतो. या दरम्यान अनेक जण उन्हापासून आराम मिळवण्यासाठी थंड ठिकाणी फिरायला जातात.

Monika Lonkar –Kumbhar

April Travel Places : मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्याला सुरूवात होते. याच महिन्यात लहान मुलांच्या परीक्षा संपतात आणि मुलांना उन्हाळ्याची सुटटी लागते. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मग, फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवले जातात. या दरम्यान अनेक जण या कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी उंच हिलस्टेशनची निवड करतात.

उंच ठिकाणी फिरायला गेल्यामुळे, थंडावा मिळतो आणि उन्हापासून आराम मिळतो. लहान मुलांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जाताना अनेकांना गर्दीची ठिकाणे नको वाटतात. कमी गर्दी असलेल्या आणि निसर्गसंपन्न ठिकाणी फिरायला जाण्यावर लोकांचा भर असतो.

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यावर तुम्हाला कडक उन्हापासून थंडावा मिळेल. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

उटी

तामिळनाडू राज्यातील हे अतिशय सुप्रसिद्ध ठिकाण आहे. दक्षिण भारतातील या निसर्गसंपन्न ठिकाणी दरवर्षी अनेक पर्यटक भेट देताना दिसतात. देश-विदेशातील लोकांची उटीला नेहमीच पसंती असते. एक सुंदर हिलस्टेशन म्हणून उटी हे शहर प्रसिद्ध आहे. येथील चहाचे मळे, उंच पर्वत, हिरवागार निसर्ग आणि इतर पर्यटन स्थळांना ही तुम्ही भेट देऊ शकता.

शिमला

हिमाचल प्रदेशातील हे ठिकाण तर पर्यटकांच्या आवडीचे आहे. दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. वळणदार रस्ते, सुंदर जुन्या इमारती, आल्हाददायक हवामान, उंच झाडे, बर्फाच्छादित प्रदेश आणि उंच टेकड्या इत्यादी गोष्टींसाठी शिमला हे ठिकाण प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात तुम्ही या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन नक्कीच करू शकता.

काश्मीर

भारतातील नंदनवन म्हणून काश्मीरची खास ओळख आहे. भारतातील स्वर्ग म्हणून ही या जागेचा लौकिक आहे. कपल्समध्ये हे एक रोमॅंटिक डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे. येथील बर्फाच्छादित प्रदेश, तलाव, उंच पर्वतरांगा आणि इतर प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील. भर उन्हाळ्यात तुम्हाला या ठिकाणी थंडावा मिळेल यात काही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT