टू व्हिलर घ्यावी का बाईक?
टू व्हिलर घ्यावी का बाईक? Esakal
लाइफस्टाइल

स्कूटर की बाईक? Two Wheeler खरेदी करताना गोंधळ उडतोय, मग या प्रकारे सुटेल प्रश्न

Kirti Wadkar

घरात एखादी टू व्हिलर असणं हे कायमच सोयीचं ठरतं. मग ती स्कूटर असो किंवा बाईक. मात्र अनेकाना टू व्हिलर खरेदी करताना एका मोठ्या प्रश्नामुळे गोंधळ उडतो. तो म्हणजे टू व्हिलर Two Wheeler घ्यावी की बाईक खरेदी करावी? Two Wheeler Purchase know benefits and disadvantages of scooter and motorbike

खरं तर बाईक आणि स्कूटर Scooter या दोन्ही वाहनांचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. मात्र तरीही Two Wheeler खरेदी करताना अनेकदा गोंधळ उडतो. खरं तर घरातील पुरुषांची कायमच बाईकला पसंती असल्याचं पाहायला मिळतं. तर घरातील स्त्रियांची किंवा ज्येष्ठांची पसंती ही स्कूटरला असते.

यामागे प्रत्येकाची कारणं वेगळी असली तरी घरात दोन चाकी वाहन खरेदी करताना गोंधळ उडतो.

अनेकदा तर योग्य पर्याय निवडता न आल्याने टू व्हिलर खरेदीचे Two Wheeler Purchase प्लॅन पुढे ढकलले जातात. टू व्हिलर खरेदीचे प्लॅन पुढे ढकलण्याऐवजी जर तुम्ही काही गरजांचा विचार केला आणि काही मुद्यांचा विचार केला तर तुम्हाला निर्णय घेणं शक्य होईल आणि घरात दारासमोर नवी टू व्हिलर उभी राहील.

जर तुम्हाला स्थानिक प्रवासासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी, बाजारात जाण्यासाठी किंवा जवळच असलेल्या कॉलेज किंवा ऑफिसला ट्रॅफिकमध्ये वेळ वाया न घालवता प्रवास करण्यासाठी वाहन हवं असेल तर स्कूटर हा एक चांगला पर्याय आहे. मात्र जर तुम्हाला दूरचा प्रवास करायचा असेल तर स्कूटरवर तुम्ही लवकर थकू शकता. अशावेळी तुम्ही बाईक हा पर्याय़ निवडू शकता.

हे देखिल वाचा-

सर्व प्रथम बजेट ठरवा

टू व्हीलर खरेदी करण्यापूर्वी सर्वप्रथम बजेट Budget ठरवा. जर तुम्हाला ७०-८० हजार रुपयांमध्ये टू व्हीलर खरेदी करायची असली तर तुम्ही बजेट फ्रेण्डली बाईक किंवा मोटरसायकलचा पर्याय निवडू शकता. कारण सध्याच्या काळात स्कूटरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. जर तुम्हाला स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्हाला जवळपास १ लाख रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागेल.

मायलेजचा विचार करा

जर तुमचं बजेट कमी असेल आणि तरीही तुम्ही चांगलं मायलेज देणाऱ्या वाहनाचा विचार करत असाल तर तुम्ही मोटरसायकल खरेदी करणं योग्य ठरेल. कारण स्कूटरची किंमत जास्त असली तरी मायलेज मात्र कमी असतं. स्कूटर ५० ते ५५ किलोमीटर मायलेज देते तर बाईक ७० किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देते. त्यामुळे अशा वेळी स्कूटर ऐवजी तुम्ही बाईकची निवड करू शकता.

कंफर्ट

जर तुम्हाला आरामदायी प्रवास करायचा असेल किंवा शरीराला आरामदायी स्थितीत ठेवून टू व्हीलर चालवायची असेल तर स्कूटर हा पर्याय चांगला आहे. कारण स्कूटर चालवणं हे आरामदायी असतं. सध्याच्या स्कूटर चालवताना गियर किंवा क्लच दाबण्याची गरज नसल्याने प्रवास आरामदायी होतं.

स्टोरेज

जर तुम्हाला स्टोअरेज हवं असेल तर मोटरसायकल ऐवजी स्कूटर खरेदी करण्याचा निर्णय घ्या. कारण स्कूटरमध्ये सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असते.

अशा प्रकारे वाहन घरातील कोणत्या व्यक्तींना अधिक चालवायचं आहे याचा आणि मायलेज, बजेट आणि स्टोरेटजा विचार करून तुम्ही टू व्हिलर खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता.

हे देखिल वाचा-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT