Angioplasty Sakal
लाइफस्टाइल

Angioplasty: अँजिओप्लास्टी झाल्यावर 'या' गोष्टी ठेवा लक्षात, येणार नाही अडचणी

Angioplasty: हृदयविकाराचा झटका आल्यानंतर व्यक्तीच्या हृदयात स्टेंट टाकला जातो, त्याला अँजिओप्लास्टी म्हणतात. तुमचीही अँजिओप्लास्टी झाली असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

Puja Bonkile

Angioplasty: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतल्या रिलायन्स रुग्णालयात यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी करण्यात आलेली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर व्यक्तीच्या हृदयात स्टेंट टाकला जातो, त्याला अँजिओप्लास्टी म्हणतात. तुमचीही अँजिओप्लास्टी झाली असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

अँजिओप्लास्टी म्हणजे काय?

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर व्यक्तीच्या हृदयात स्टेंट टाकला जातो, त्याला अँजिओप्लास्टी म्हणतात. जे ब्लॉकेज उघडण्यास मदत करते. ही एक शस्त्रक्रिया आहे. यात हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या उघडल्या जातात. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टर अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात.

शरीर सक्रिय ठेवा

अँजिओप्लास्टीनंतर आरम करणे गरजेचे आहे. पण हलका व्यायाम करू शकता. जसेकी चालणे किंवा शारीरीक हालचाली करू शकता. पण एकाच जागी जास्त वेळ उभे राहू नका. तसेच पायऱ्यांचा अतिवापर टाळावा.

विश्रांती घ्या

शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरीराला हलके ठेवा आणि आराम द्या. सकस आहारवर भर द्या. चहा आणि कॉफीचे अतिसेवन टाळा. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहील.

औषधं वेळेवर घेणे

अँजिओप्लास्टी झाल्यानंतर औषधं वेळेवर घ्यावी. वेळेवर औषधं घेतल्यास कोणताही त्रास किंवा रक्तस्त्राव होणार नाही. यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधं घेणे गरजेचे आहे.

तेलकट पदार्थ टाळा

अँजिओप्लास्टी झाल्यानंतर रूग्णांनी तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. कारण यामुळे त्रास होऊ शकतो. तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर या पदार्थांचे सेवन न करता सकस आहार घ्यावा.

पुढील गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

छातीत दुखणे. अपचन, धाप लागणे यासारख्या गोष्टींचा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT