use of apple for face beauty and precaution tips for women in kolhapur 
लाइफस्टाइल

Beauty Tips - सफरचंदापासून घरीच तयार करा क्रीम; चेहरा बनेल तजेलदार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जसेजसे वय वाढत जाते तसे तसे शरीरामध्ये अनेक बदल होत जातात. वाढते वय त्वचेला आकर्षित करत असते. त्वचा सैलसर होते आणि त्वचेची चमक ही कमी होते. जर तुमची त्वचा काळाबरोबर सैलसर होत असेल, तुम्हाला युथफुल दिसायचे असेल तर नाईट क्रीमच वापर नक्की करून पहा. बाजारामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे ब्रँड्स मिळतील. पण ते खूप महाग आहेत. याचा त्वचेवर प्रभाव पडत नाही. त्यामुळे तुम्ही घरीच नाईट क्रीम बनवू शकता. यासाठी तुम्हाला सफरचंद लागतील. यामध्ये घरातील काही इंग्रेडीयेंटस मिसळून नाईट क्रिम बनवू शकता. चला आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सफरचंद पासून नाईट क्रीम कशी बनवावी..

साहित्य :

  • 2 सफरचंद
  • 5 मोठे चमचे गुलाब जल
  • 1 मोठा चमचा अलोवेरा जेल
  • 1 छोटा चमचा ऑलिव्ह ऑइल

कसे बनवायचे:  

  • सर्वात पहिला सफरचंद धुवून, सोलून घ्या.
  • आता सफरचंदाचे छोटे छोटे तुकडे करून बारीक करुन घ्या.
  • सफरचंद बारीक करून घेताना तुम्हाला त्यामधे ऑलिव्ह ऑइल घालवे लागेल.
  • त्यानंतर हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्या.
  •  जेव्हा हे मिश्रण उकळले जाईल, त्यानंतर ते थंड होईपर्यंत ठेवा.
  • जेव्हा मिश्रण थंड होईल तेव्हा त्यामधे गुलाब जल, अॅलोवेरा जेल टाका.
  • हे मिश्रण एकत्र करून घ्या आणि ते हवा बंद डब्यात 10 दिवसांसाठी ठेवा.
  • आता तुमची घरी बनवलेली नाईट क्रीम तयार आहे, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा आणि मानेला ही क्रीम तुम्ही लावू शकता.

सफरचंदाचे त्वचेसाठी लाभ :

सफरचंदमध्ये अँटी एम्फलेमेटरीचे गुण असतात. जर त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारची सूज ही क्रीम लावल्याने दूर होऊ शकतात.

सफरचंदमध्ये सी व्हिटॅमिनचे प्रमाण अधिक असते. यात अँटी ऑक्सीडंट असतात जे त्वचेला युथफुल बनवते आणि चेहरा चमकदार बनवते. चेहऱ्यावरील पुरळ  कमी होतात .

सफरचंदाची क्रीम अँटी एजिंग असते. जसे वय वाढते तशी त्वचा सैलसर होते. त्यामुळे सफरचंदयुक्त क्रीम लावल्याने त्वचेचा पोर्स कमी होतो.
  
या क्रीममुळे युवीकिराणांपासून त्वचेचे सरंक्षण होतेय.

त्वचेसाठी गुलाब जलाचे लाभ:

गुलाब जलमध्ये  स्किन व्हाईटनिंगचे गुण असतात. हे त्वचेवर लावल्याने चेहरा स्वच्छ होतो, चेहऱ्यावर चमकही येते.
 
गुलाबजल त्वचेचा पीच स्तर तसेच त्वचा बॅलेन्स करते. त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवत नाही.

गुलाबजल मध्ये अँटी माइश्चराइज‌ असतात. ते खोलवर जाऊन कोरडी त्वचा दूर करतात.

त्वचेसाठी ऑलिव्ह ऑइलचे लाभ:

व्हिटॅमिन ई मधून त्वचेला ऑलिव्ह ऑइलचे  फायदा होतो. हे त्वचेला युथफुल बनवण्यासाठी मदत करते. हे त्वचेवर लावल्याने एक वेगळीच चमक दिसून येते.

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी ऑक्सीडंटचा खजाना असतो. हे त्वचेमधील फ्री रेडिकल्सपासून बचाव करते.

त्वचेला माइश्चराइज करण्यासाठी या ऑइलचाही वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Pune News: गॅस पाइपलाइनसाठी केंद्राची नवी नियमावली; परवानगी प्रक्रियेतील अडथळे दूर, घरगुती पीएनजी वापराला मिळणार गती

Pune News: हवेलीतील ४६ अधिकारी दोषी! पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार प्रकरण, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार..

IPL 2026 Marathi News: हर्षित राणाच्या जागी KKR च्या ताफ्यात भारताचा स्पीडस्टार... गुजरात टायटन्सनेही खेळाडू बदलला

IPL 2026 मध्ये 'इम्पॅक्ट खेळाडू' चा नियम राहणार की नाही? रोहित, विराट, अक्षर यांच्या विरोधानंतर BCCI अ‍ॅक्शन मोडवर; बैठकीत बरंच काही घडलं

SCROLL FOR NEXT