Vastu Tips  esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips : घरात नकारात्मक उर्जा अन् वास्तू दोष आहेत की नाही, हे कसे ओळखावे?

घरातील काहीही चुकलं तरी चालेल पण देवघराची दिशा चुकवू नका

Pooja Karande-Kadam

Vastu Tips :

काहीवेळा घरात सतत वाद होत असतात. सामान्य कुटुंबात घरात सतत नकारात्मक गोष्टी घडत असतील. तर ग्रहमान तपासण्याचा, कुंडली शास्त्राचा आधार घेण्याचा सल्ला दिला जातो. काही लोक वास्तू शास्त्राचाही आधार घेतात. कारण,घर बांधणं किंवा नवं घेणं प्रत्येकवेळी वास्तू दोष निवारण करूनच घेण्याचा विचार केला जातो.

पण घरात वास्तू दोष आहेत की नाही, काही नकारात्मक गोष्टी कशामुळे घडत आहेत याचा अंदाज बांधणे कठीण असते. त्यामुळेच, काही सोप्या गोष्टींनी तुमच्या घरातही वास्तू दोष आहेत का हे कसे तपासायचे हे पाहुयात.

प्रवेशद्वाराची दिशा

वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. दिशेनुसार घराचे बांधकाम आणि घरात ठेवलेल्या वस्तूंचे वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व आहे. घराची स्थिती योग्य दिशेला असेल तर वास्तुदोष होत नाही. वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा शुभ मानली जात नाही.  जर तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष कायम राहू शकतात.

जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर हा वास्तू दोष दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर श्रीगणेशाची मूर्ती आणि दोषनाशक यंत्र हे वास्तू दोष दूर करण्याचे महत्त्वाचे साधन मानले जाते. या उपायाने घरातील वास्तुदोष टाळता येतात.  

घरातील मंदिराची दिशा

हिंदू धर्मात घरात बांधलेल्या देवघराला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, मंदिराच्या ठिकाणी जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा नेहमीच असते. वास्तुशास्त्रात गृह मंदिराची दिशा म्हणजेच ईशान्य दिशेला सर्वात शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात बनवलेले मंदिर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल तर ते अशुभ मानले जाते.

त्यामुळे घरात वास्तु दोष निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत मंदिर या दिशेला ठेवायला विसरू नका. मंदिर चुकीच्या दिशेला लावल्यास घरातील सदस्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

घरात तुटलेल्या वस्तू असणे

वास्तुशास्त्रानुसार तुटलेली आणि निरुपयोगी भांडी किंवा वस्तू घरात ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतात. वास्तूमध्ये तुटलेल्या वस्तूंना गरिबीचे लक्षण मानले जाते. यामुळे संपूर्ण घरात वास्तुदोष कायम राहतात. अशा परिस्थितीत तुमच्या घरातील वापरात नसलेली भांडी ताबडतोब घराबाहेर फेकून द्यावीत.

विखुरलेल्या वस्तू

काही घरात कितीही वस्तू सरळ ठेवल्या तरी ते घर विखुरलेलंच वाटतं. त्यात कधीच निटनिटकेपणा वाटत नाही, असे तुमच्याही बाबतीत घडत असेल. तर हा मोठा वास्तू दोष आहे. कितीही आवराआवर केली तरी घर विस्कळीतच दिसतं तेव्हा समजून जा की हा दोष आहे. अशा गोष्टीमुळे घरात सतत पैशांच्या अडचणी निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT