Viagra Side Effects
Viagra Side Effects  google
लाइफस्टाइल

Viagra Side Effects : लैंगिक संबंध सोपे करणारी व्हायग्रा ठरू शकते धोकादायक

नमिता धुरी

मुंबई : इरेक्टाइल डिसफंक्शनने ग्रस्त असलेले पुरुष Viagra Tablet घेतात. ही गोळी रक्तप्रवाह वाढवून जननेंद्रियातील ताण वाढवते. व्हायग्रामध्ये सिल्डेनाफिल हे औषध असते, जे 10 प्रकारच्या पुरुषांनी आयुष्यात कधीही घेऊ नये.

फुफ्फुसीय उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी देखील व्हायग्राचा वापर केला जातो. जेव्हा फुफ्फुसांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये उच्च रक्तदाब असतो तेव्हा त्याला पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणतात.

ही माहिती यूकेच्या प्रतिष्ठित आरोग्य वेबसाइट एनएचएसनुसार आहे. आता जाणून घ्या कोणत्या पुरुषांनी कधीही व्हायग्राचे सेवन करू नये. हेही वाचा - इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

NHS नुसार, 10 प्रकारच्या पुरुषांना Viagra घेतल्याने गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

  • सिल्डेनाफिल किंवा इतर औषधांची ऍलर्जी असलेल्या रुग्णांना

  • छातीत दुखण्यासाठी नायट्रेट औषधे घेत असलेले पुरुष

  • हृदय आणि यकृत रोग असलेले पुरुष रुग्ण

  • स्ट्रोक, हृदयविकाराचा धोका असलेले पुरुष

  • कमी रक्तदाब असलेले रुग्ण

  • दुर्मिळ अनुवांशिक डोळा रोग असलेले रुग्ण

  • सिकलसेल अॅनिमिया, ल्युकेमिया, मल्टिपल मायलोमा यासारखे रक्ताचा कर्करोग असलेले रुग्ण

  • जननेंद्रियाचे विकार असणारे पुरूष

  • पोटात अल्सरग्रस्त पुरूष

  • रक्तस्राव समस्याग्रस्त पुरुष

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, द्राक्षाच्या रसासोबत व्हायग्रा कधीही घेऊ नये. ही चूक केल्यास तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. पुरुष हे पाण्यासोबत सेवन करू शकतात.

व्हायग्राचे सामान्य दुष्परिणाम

  • डोकेदुखी

  • मळमळ

  • हॉट फ्लश

  • अपचन

  • वाहती सर्दी

  • चक्कर येणे

साइड इफेक्ट्स दिसल्यास हे काम करा

Viagra टॅब्लेट घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसले, तर तुम्ही ताबडतोब विश्रांती घ्या आणि पाणी प्या. पण आराम न मिळाल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा, कारण त्याचे काही दुष्परिणाम दर्शवू शकतात.

जास्तीत जास्त परिणामासाठी Viagra कधी घ्यावे ?

सिल्डेनाफिल औषधाचा प्रभाव दर्शविण्यासाठी 30 ते 60 मिनिटे लागतात. परंतु तज्ञ संभोगाच्या 4 तास आधी व्हायग्रा घेण्याचा सल्ला देतात. त्याच वेळी, रिकाम्या पोटी व्हायग्रा घेतल्याने जलद परिणाम मिळतात.

सूचना : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT