Walking Benefits  esakal
लाइफस्टाइल

Walking Benefits : दररोज एवढे चालल्याने मृत्यूचा धोका कमी होतो, जाणून घ्या चालण्याचे इतर फायदे

दररोज 500 पावले चालल्याने हृदयविकारामुळे होणारे मृत्यू 7 टक्क्यांनी कमी होऊ शकतात

Pooja Karande-Kadam

Walking Benefits : चालण्याचे फायदे निरोगी राहण्यासाठी लोक अनेक व्यायाम करतात. बरेच लोक जिममध्ये व्यायाम करतात, तर काही लोक दररोज चालण्याच्या मदतीने स्वतःला निरोगी आणि सक्रिय ठेवतात. अलीकडेच चालण्याबाबत एक अभ्यासही समोर आला आहे, ज्यामध्ये रोज ४००० पावले चालल्याने मृत्यूचा धोका कसा कमी करता येईल हे सांगण्यात आले आहे.

निरोगी राहण्यासाठी जेवढा सकस आहार घेणे आवश्यक आहे, तेवढेच शारीरिक क्रियाशील असणेही महत्त्वाचे आहे. बरेच लोक स्वतःला निरोगी आणि ऍक्टीव्ह ठेवण्यासाठी वारंवार चालतात. आरोग्यासाठी चालणे खूप फायदेशीर आहे.

आता अलीकडेच या संदर्भात एक अभ्यासही समोर आला आहे, ज्यामध्ये असे समोर आले आहे की फक्त चालण्याने तुमच्या आरोग्याला खूप फायदा होऊ शकतो. खरं तर, अभ्यासात असे समोर आले आहे की, दररोज सुमारे 4000 पावले चालल्याने मृत्यूचा धोका कमी होतो. (Walking this much daily can reduce the risk of death)

याशिवाय, अभ्यासात हे देखील समोर आले आहे की जर तुम्ही दररोज 2,337 पावले चालत असाल तर हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. या अभ्यासाबद्दल सविस्तर जाणून घेऊया-

चालणे किती फायदेशीर आहे?

जगभरातील सुमारे 2,26,889 लोकांवर केलेल्या 17 वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये असे आढळून आले की, तुम्ही जितके जास्त चालाल, तितका तुमच्या आरोग्याला फायदा होईल.

युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की, 500 ते 1,000 पावले चालणे हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यूचा धोका 15 टक्क्यांनी कमी करू शकतो. (Walking benefits for health)

अभ्यास काय सांगतो?

या अभ्यासात असेही सांगण्यात आले आहे की, दररोज 500 पावले चालल्याने हृदयविकारामुळे होणारे मृत्यू 7 टक्क्यांनी कमी होऊ शकतात.

अभ्यासात सहभागी असलेल्या तज्ञांच्या मते, दररोज किमान 4,000 पावले चालणे कोणत्याही कारणामुळे होणारे मृत्यू कमी करू शकतात. यासोबतच त्यांनी हे देखील सांगितले की हे स्त्री आणि पुरुष दोघांवरही समानतेने काम करते. (Research)

चालण्याचे फायदे (Walking Benefits)

चालण्याने मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो, असे नुकत्याच झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे. रोज चालण्याने आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया चालण्याचे आणखी काही फायदे-

- जर तुम्ही दररोज सकाळी चालत असाल तर ते तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी होते.

- दररोज सुमारे ३० मिनिटे चालल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. अशा परिस्थितीत बीपीच्या रुग्णांसाठी दररोज चालणे फायदेशीर ठरू शकते. (Blood Pressure)

- तुम्हाला वजन कमी करायचे असले तरी चालणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. रोज चालण्याने कॅलरीज बर्न होतात.

- मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी चालणे खूप फायदेशीर आहे. दररोज सुमारे 30 मिनिटे चालल्याने या समस्येपासून आराम मिळेल.(Diabetes)

- जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज 30 मिनिटे चालले पाहिजे. असे केल्याने स्नायू मजबूत होतील आणि सांधेदुखीपासून आराम मिळेल.

- नियमित चालल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. जर तुम्ही थकलेले असाल तर चालल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होऊन तुम्हालाफ्रेश वाटू शकते. कारण चालल्यामुळे ऑक्सीजनचा प्रवाह वाढण्याबरोबर शरीरातील कॉर्टिसोल, एपिनेफ्रिन आणि नॉरपेनेफ्रिन या एनर्जी हॉरमॉन्सची पातळी वाढते. (Energy)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT