Weight Loss Jurney esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Journey : गणेश आचार्यने केलं चक्क 98 किलो वजन कमी, जाणून घ्या प्रेरणादायी प्रवास

सिनेसृष्टीतला प्रसिद्ध कोरीओग्राफर गणेश आचार्य याचं २०० किलो वजन झालं होतं.

धनश्री भावसार-बगाडे

Famous Choreographer Ganesh Acharya : बॉलिवूडमधल्या अनेक गाण्यांवर कलाकारांबरोबर चाहत्यांनाही थिरकायला लावणारा सिनेसृष्टीतला प्रसिद्ध कोरीओग्राफर गणेश आचार्य. गणेश आचार्यच्या स्टेप्समुळे अनेक जण गोविंदाच्या डान्सचे फॅन झालेत.

डान्स ही बेस्ट एक्सरसाइज समजली जात असली तरी कोरिओग्राफर असणाऱ्या गणेश आचार्य याचं वजन एकेकाळी २०० किलो झालं होतं. त्यांच्या प्रचंड वजनासह केल्या जाणाऱ्या डांस मूव्हज भारी वाटत असलं तरी ते आरोग्यासाठी फार धोकादायक असतं.

त्यामुळे २०१५ नंतर त्याने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि अनेक आव्हानं पेलत थोडे थोडके नाही तर चक्क ९८ किलो वजन कमी केलं. गणेशचा हा वेटलॉस प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

वेटलॉस प्रवास

गणेशने याविषयीचा खुलासा कपिल शर्माच्या शोमध्ये केला होता. त्याने २ वर्ष आपले वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. हा प्रवास आपल्यासाठी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होता असं त्याने सांगितलं होतं.

कोणते व्यायाम प्रकार?

  • वजन कमी करण्यासाठी तो योगासन, जीम करत असे.

  • त्याचे वजन २०० किलो झाल्याने त्याला श्वास घ्यायलाही त्रास होत असे. पण वजन कमी करण्यासाठी त्याला जीम ट्रेनर अजय नायडूचा आधार मिळाला.

  • वर्कआऊट सेशन त्याच्यासाठी सर्वात कठीण असल्याचं त्याने मुलाखतीत मान्य केलं होतं.

  • त्याने वजन कमी करण्यासाठी पोहण्याचाही व्यायाम केला.

  • साधारण १५ दिवस पोहणे ट्रेनिंग झाल्यावर ट्रेनर क्रंचेस करून घेत असे.

  • याशिवाय रोज कमीत कमी ७५ मिनीटे व्यायाम तो करत असे.

  • यात ११ व्यायामाचे प्रकार होते. कितीही आव्हानं असले तरी त्याने रोज न चुकता व्यायाम केला.

  • वजन असतानाही गणेश आचार्य उत्तम डांस करत होते. मात्र वजन कमी झाल्यावर अधिक एनर्जींने करता येऊ लागल्याचं त्याने सांगितलं.

डाएटमध्ये खास बदल

  • वर्क आऊटनंतर सकाळी १२ वाजेच्या आत आणि रात्री ८ वाजेनंतर खाणे त्याने बंद केले.

  • खाण्यात फळांचा समावेश वाढवला.

  • ग्रीन टी, ब्लॅक टी आणि सूप्सचा अधिक समावेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

Latest Maharashtra News Updates : एटीएममध्ये मदतीच्या नावाखाली तरुणाची फसवणूक

SCROLL FOR NEXT