लाइफस्टाइल

New Year Party Look : ऑफिसच्या न्यू इयर पार्टीमध्ये हे वेस्टर्न आउटफिट्स नक्की ट्राय करा

आज आम्ही तुम्हाला वेस्टर्न आउटफिट्सचे काही स्टायलिश डिझाईन्स दाखवणार आहोत जे तुम्ही न्यू इयर पार्टीसाठी घालू शकता. त्यांना स्टाईल करण्यासाठी आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स देखील सांगू.

Aishwarya Musale

प्रत्येकजण नवीन वर्षाच्या पार्टीसाठी तयार आहे. अनेक ऑफीस आहेत जिथे पार्ट्या होतात. प्रत्येकजण सुंदर दिसावा म्हणून चांगले कपडे घालून तिथे येतो. विशेषत: मुली कारण पार्टीत सर्वात सुंदर दिसण्यासाठी त्या आधीच आउटफिटचे नियोजन करत असतात.

पण यानंतरही त्या कंन्फ्यूज असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वेस्टर्न आउटफिट्सचे काही स्टायलिश डिझाईन्स दाखवणार आहोत जे तुम्ही न्यू इयर पार्टीसाठी घालू शकता. त्यांना स्टाईल करण्यासाठी आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स देखील सांगू.

व्हाईट पँट सूट

जर तुम्हाला पार्टीमध्ये थोडा प्रोफेशनल लूक करायचा असेल, तर तुम्ही व्हाईट पँट सूट स्टाईल करू शकता. या फोटोमध्ये हिना खानने परिधान केल्याप्रमाणे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. बाजारातून असे आउटफिट्स खरेदी करून तुम्ही ऑफिस पार्टीमध्ये त्यांना स्टाइल करू शकता आणि परफेक्ट दिसू शकता. याच्या मदतीने तुम्ही पर्ल डिझाईन केलेले कानातले आणि बोल्ड मेकअपने लूक पूर्ण करू शकता.

जंपसूट

जर तुम्हाला कम्फर्टेबल दिसायचे असेल तर तुम्ही पार्टीत जंपसूट घालू शकता. त्यात खूप चांगल्या डिझाईन्स उपलब्ध आहेत. या फोटोत दिया मिर्झानेही जंप सूट घातला आहे जो सोनेरी रंगाचा असून त्यावर प्रिंट वर्क आहे. हा जंपसूट रितू कुमारने डिझाइन केला आहे. ऑफिस पार्टीमध्ये तुम्ही या प्रकारचे जंपसूट स्टाईल देखील करू शकता. हे तुम्हाला बाजारात 500 ते 1000 रुपयांना मिळतील.

लाँग गाउन

जर तुम्हाला काही नवीन ट्रेंड आउटफिट स्टाईल करायचे असतील तर तुम्ही यासाठी लाँग गाऊन स्टाईल करू शकता. आजकाल तुम्हाला अधिक प्लीट्स असलेले गाऊन मिळतील. जे तुम्ही पार्टीत घालू शकता. स्टायलिश लूकसाठी तुम्ही यासोबत ज्वेलरी आणि हील्स आणि स्लीक ओपन हेअरस्टाईल देखील अ‍ॅड करून शकता. यामुळे तुम्ही वेगळे आणि सुंदर दिसाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Latest Marathi News Live Update : केदारनाथ मंदिरासाठी चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा खराब हवामानामुळे स्थगित

SCROLL FOR NEXT