Date And Almond Ladoo Sakal
लाइफस्टाइल

Almond Dates Ladoo Benefits मुलांना खजूर-बदामाचे लाडू खायला द्या, जाणून घ्या फायदे व रेसिपी

Date And Almond Ladoo : खजूर आणि बदामाचे सेवन करणे लहान मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या सुकामेव्यापासून लाडू कसे तयार करायचे याची रेसिपी जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Almond Date Ladoo Recipe : सुकामेव्यामध्ये हेल्दी फॅट्सचे प्रमाण जास्त असते. सुकामेव्याचे सेवन केल्यास शरीरामध्ये ऊर्जा दीर्घकाळासाठी टिकून राहते. म्हणूनच प्रौढांप्रमाणेच लहान मुलांच्या आरोग्यासाठीही ड्रायफ्रुट्सचे सेवन करणे फायदेशीर असते. यातील पोषणतत्त्वांमुळे मुलांचे शरीर मजबूत होण्यास मदत मिळते.

बाळ वयाने लहान असेल तर त्यांचे दात येईपर्यंत ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये वाटून खाऊ घालावे. तसंच सुकामेव्यांपासून स्वादिष्ट पदार्थही तयार करून आपण त्याचा लहान मुलांच्या डाएटमध्ये समावेश करू शकता. या लेखाद्वारे आपण बदाम आणि खजूर यापासून लाडू कसे तयार करायचे, याची रेसिपी जाणून घेऊया.

खजूर-बदामाच्या लाडूंची रेसिपी (How To Make Almond And Dates Ladoo In Marathi)

सामग्री 

  • बदाम - एक चतुर्थांश कप 

  • खजूर - 10 

  • आवश्यकतेनुसार मनुके

  • आवश्यकतेनुसार तूप

लाडू तयार करण्याची पद्धत

  • सर्वप्रथम बदाम गरम तव्यावर भाजून घ्यावे. यानंतर बदाम थंड करत ठेवावे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटावे. 

  • आता एका बाऊलमध्ये खजूर व मनुके एकत्रित करा आणि मॅश करा. 

  • पॅन गरम करत ठेवा आणि त्यावर खजूर-मनुक्यांचे मिश्रण थोड्याशा तुपामध्ये परतून घ्यावे. 

  • यानंतर गॅस बंद करावा व मिश्रण थंड होऊ द्यावे.

  • हे मिश्रण आता बदामाच्या पावडरमध्ये मिक्स करावे.

  • हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि छोट्याछोट्या आकाराचे लाडू वळून घ्यावेत.

  • लाडू वळून झाल्यानंतर एका डब्यात भरून ठेवा आणि एकदिवसाआड आपल्या मुलांना लाडू खाऊ घालावा.

खजूर आणि बदामाच्या लाडूचे फायदे ( Benefits of Almond And Dates Ladoo)

  •  खजूर आणि बदामामध्ये शरीरास आवश्यक असणारे व्हिटॅमिन, खनिजे, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. हे घटक लहान मुलांच्या शारीरिक विकासाकरिता लाभदायक आहेत. 

  • शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत मिळते. 

  • मेंदूच्या विकासाकरिता आवश्यक असणारे पोषक घटक खजूर व बदामामध्ये असतात. यामुळे डाएटमध्ये या सुकामेव्याचा समावेश करावा. 

  • बदाम आणि मनुक्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा - 3 फॅटी अॅसिड हे गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. 

 डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

SCROLL FOR NEXT