Moles on Feet Reveal Unique Personality Traits: आपल्या शरीरावर कुठे तिळ आहे, याचा आपल्या स्वभावावर आणि नशिबावर काही परिणाम होतो असं मानलं जातं. हातावरच्या रेषांप्रमाणेच पायावर असलेले तिळ देखील आपल्या व्यक्तिमत्त्वाचे काही गुपित सांगतात. समुद्रशास्त्रानुसार पायांवरील तिळाचे काही खास अर्थ असतात. चला, पाहूया पायावर तिळ कुठे आहे यावरून काय काय माहिती मिळते.
ज्यांच्या उजव्या पायावर तिळ असतो, ते खूप हुशार, समजूतदार आणि अभ्यासू असतात. हे लोक मेहनत करायला घाबरत नाहीत आणि त्यामुळे शिक्षण, करिअर यामध्ये चांगलं यश मिळवतात. त्यांच्यात काहीतरी मोठं करून दाखवायची क्षमता असते.
ज्यांच्या दोन्ही पायांवर तिळ असतो, त्यांच्या आयुष्यात थोडासा तणाव आणि तब्येतीच्या तक्रारी जास्त असतात. ते थोडे चिडचिडे किंवा मन शांत नसलेले असतात. काहीवेळा त्यांना वाटतं की नशिबाने आपल्याला फार साथ दिली नाही.
या ठिकाणी तिळ असलेले लोक खूप क्रिएटिव्ह असतात, म्हणजेच त्यांना नवनवीन कल्पना सुचतात, ते वेगळ्या मार्गाने विचार करतात. कला, लेखन, डिझाईन, अशी कामं त्यांना आवडतात आणि ते अगदी सहजतेने ती कामं करतात.
ज्या लोकांच्या टाचेवर तिळ असतो, ते खूप पॉझिटिव्ह विचार करणारे असतात. त्यांना प्रवासाची आवड असते, सतत कुठे तरी फिरायला जाण्याचा प्लॅन असतो. उजव्या पायाच्या टाचेवर तिळ असल्यास त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळते असंही मानलं जातं.
ज्यांच्या पायाच्या तळव्यावर तिळ असतो, ते लोक व्यवसायात यशस्वी होतात. त्यांना पैसे कमावण्याची कला माहीत असते. आणि जर तिळ बोटावर, विशेषतः अंगठ्यावर असेल, तर अशा लोकांना समजून घेणं, नीट बोलणं, आणि काम व्यवस्थित हाताळणं माहीत असतं.
ज्यांच्या डाव्या पायावर तिळ असतो (खास करून पुरुषांचं वर्णन इथे केलं जातं), ते आर्थिकदृष्ट्या बरेचसे स्थिर असतात. ते स्वतःवर आणि इतरांवर खर्च करायला मागे-पुढे पाहत नाहीत. अशा लोकांची साथ मिळणं इतरांसाठी आनंददायक असतं.
शेवटी हे लक्षात घ्या – तिळ कुठे आहे यावरून आपल्याला काही संकेत मिळू शकतात, पण त्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यापेक्षा, आपलं आयुष्य कसं घडवायचं हे आपल्या हातात असतं.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.