Zika Virus Sakal
लाइफस्टाइल

Zika Virus: नागरिकांनो, घ्या काळजी...आता 'झिका'चा धोका

घराजवळ पाण्याचे डबके साचू देऊ नका. डासांची उत्पत्ती होऊ देऊ नका.

सकाळ वृत्तसेवा

माधव इतबारे/सचिन पवार

पावसाळा सुरू झाला आहे. या ऋतूत डायरिया, टायफॉइड, हॅपेटायटीस ए आणि ई, डेंगी, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस यांसह विविध जलजन्य आजार वाढतात. या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी शुद्ध पाणी पिणे, स्वच्छता राखणे आणि पावसाळ्यातील दूषित पाण्याचा संपर्क टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी नेमके काय करावे, काळजी कशी घ्यावी याच्या काही टिप्स...

डासांमुळे चिकनगुण्या, डेंगीनंतर आता ‘झिका’ नावाच्या आजाराचा धोका वाढला आहे. राज्यातील काही शहरांत या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. छत्रपती संभाजीनगरात ‘झिका’चा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. ही दिलासादायक बाब असली तरी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘एडिस’ डासांमुळे झिका आजाराचा फैलाव होतो. पावसामुळे खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात, ओल्या कचऱ्यामध्ये या डासांची उत्पत्ती होते. डासांमुळे मागील काही वर्षांत चिकनगुण्या, डेंगीसारखे आजार झाले आहेत. या आजारानंतर आता झिका हा आजार वाढत आहेत. पुणे शहरात झिका आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. शहरातील नागरिकांचा पुण्यासारख्या शहराशी असलेला संबंध पाहता, संभाजीनगरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. परंतु, शहरात अद्याप एकही रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. भविष्यात रुग्ण आढळल्यास आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अशी आहेत लक्षणे

ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी.

अशी घ्या काळजी

घराजवळ पाण्याचे डबके साचू देऊ नका. डासांची उत्पत्ती होऊ देऊ नका.

ओला कचरा साठणार नाही, याची काळजी घ्या.

खिडक्यांना जाळी बसवा.

शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घाला.

आपल्याकडे झिकाचा एकही रुग्ण आढळलेला नसून ही बाब समाधानकारक आहे. मात्र, नागरिकांनी काळजी घेत डासांची उत्पत्ती रोखावी.

- डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT