photo Sakal
लाइफस्टाइल

डोळ्यांना फसवणारे 'हे' चित्र उघडू शकते तुमच्या व्यक्तिमत्वाचं रहस्य

काही फोटो आपली नजर, व्यक्तिमत्व आणि भावनांशी संबंधित गुपिते उघड करु शकतात.

सकाळ डिजिटल टीम

चित्रांतून आणि फोटोंतून अनेक गुपिते उघड होतात असं म्हटलं जातं. फोटोतही अनेक रहस्य लपलेले असतात. असे काही फोटो आपली नजर, व्यक्तिमत्व आणि भावनांशी संबंधित गुपिते उघड करु शकतात. आपल्याला दिसत असलेला फोटो हा लोरा विलियम्स यांनी काढलेला आहे असं सांगितलं जातंय. हा फोटो बघितल्यावर आपला भावनिक दृष्टीकोन किती मजबूत आहे हे आपल्याला कळेल.

Photo

या फोटेमध्ये तीन भाग आहेत. त्यापैकी आपल्याला पहिल्यांदा कोणता भाग दिसतो यावर आपला स्वभाव आणि स्वभाववैशिष्ट्ये समजून येतात. हा फोटो न बोलता आपल्या स्वभावातील गुपिते सांगू शकतो हेच खरं वैशिष्ट्य या फोटोचं आहे. या फोटोत एक मुलगी गवतावर बसलेली आहे आणि तीने हातात एक आरसा धरलेला आहे. या फोटोचे तीन भाग आहेत. एक हिरवं गवत, दुसरा तीच्या हातातील आरसा आणि तिसरा भाग म्हणजे बसलेली मुलगी. या तीन भागांपैकी आपण पहिल्यांदा कोणता भाग पाहतो यावरुन आपल्या स्वभावाची वैशिष्ट्ये समजणार आहेत.

जर तुम्ही पहिल्यांदा या फोटोतील बसलेल्या मुलीकडे पाहत असाल तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप बुद्धिमान असून आजूबाजूच्या लोकांचा तुमच्या बुद्धीकौशल्यावर पूर्ण विश्वास आहे.

जर तुम्ही हा फोटो बघताना पहिल्यांदा तुमची नजर आरश्यावर पडत असेल तर तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप मजबूत आहात. त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकता असाही याचा अर्थ होतो.

आणि फोटो बघताना तुम्हाला जर हिरवं गवत पहिल्यांदा दिसत असेल तर असे लोक त्यांच्या जीवनातील प्रत्येक व्यक्तींची खूप काळजी करतात. त्याचबरोबर हे लोक त्यांच्या जवळच्या लोकांकडून मदत मागायला संकोच करत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT