Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : हिवाळ्यात संत्रा खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या ‘हे’ फायदे

संत्रा हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : आरोग्यासाठी फायदेशीर असणारे संत्रा हे फळ जगभरातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक असलेले फळ आहे. संत्र्याचा ज्यूस हा आवर्जून प्यायला जातो. या फळाचे सेवन देखील केले जाते.

अनेकांच्या नाश्त्यामध्ये संत्र्याच्या ज्यूसचा समावेश असतो. दिवसाची सुरूवात चांगली करण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. संत्रा हे फळ चवीला आंबट-गोड लागते. व्हिटॅमीन सी चा प्रमुख स्त्रोत म्हणून ही या फळाकडे पाहिले जाते.

मात्र, संत्र्याचा ज्यूस करून पिण्यापेक्षा ते फळ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसांमध्ये हे फळ खाण्याची एक योग्य वेळ आहे. त्यावेळी, ते खाल्ले तर तुम्हाला कोणताही त्रास होत नाही.

हिवाळ्यात हे फळ कोणत्या वेळी खावे? याबद्दल लोकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे, आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला हिवाळ्यात संत्रा कोणत्या वेळी खावे? आणि त्याचे फायदे कोणते? याबद्दल सांगणार आहोत.

रिकाम्या पोटी खाणे टाळावे

काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते संत्र्याचा ज्यूस किंवा संत्र्याचे फळ हे शक्यतो रिकाम्या पोटी खाणे टाळावे. सकाळी किंवा रात्री या फळाचे सेवन करू नये. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री हे फळ खाल्ले तर यातील अ‍ॅसिड रिफ्लॅक्स होण्याचा धोका असतो.

त्यामुळे, हिवाळ्यात दुपारच्या वेळी संत्र्याचा ज्यूस प्यावा किंवा हे फळ खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. या फळामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पोटाच्या समस्या दूर होतात

संत्र्यामध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे फळ फायदेशीर आहे. कारण, हे फळ खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हे फळ खाल्ल्याने पोटाच्या समस्या देखील दूर होतात आणि पचनक्षमता सुरळीत राहण्यास मदत होते.

स्किन राहते हेल्दी

संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येते. हे व्हिटॅमीन सी आपली त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करते. संत्रा खाल्ल्याने त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते. तसेच, स्किन फ्रेश आणि सुंदर दिसते. त्यामुळे, हिवाळ्यात निरोगी त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी संत्र्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT