Vastu Tips
Vastu Tips Sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: मंदिरातून बाहेर पडताना घंटी का वाजवू नये? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

पुजा बोनकिले

why do not ring temple bell while go out side read vastushtra tips

मंदिरात प्रवेश करताच भाविक सर्वात पहिले घंटी वाजवून देवासमोर नतमस्तक होतात. मंदिरातील घंटी वाजवण्याशी अनेक धार्मिक आणि अध्यात्मिक गोष्टी निगडीत आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की मंदिरातील घंटी वाजवण्याबाबत वास्तुशास्त्रातही अनेक नियम सांगण्यात आले आहेत.

वास्तुशास्त्रानुसार मंदिरातील घंटी सकारात्मक उर्जेशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार मंदिराची घंटी सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. मंदिरात प्रवेश करताना घंटी वाजवली पाहिजे हे अनेकांना माहीती असेल, पण मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवणे अशुभ मानले जाते.

  • मंदिरात घंटी का वाजतात?

ध्वनीचा संबंध ऊर्जेशी असतो असे मानले जाते. जेव्हा जेव्हा मंदिराची घंटी वाजते तेव्हा घंटी वाजवणाऱ्या आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये ऊर्जा प्रसारित होते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रासोबतच स्कंदपुराणातही मंदिराची घंटी वाजवताना ‘ओम’च्या नादासारखीच असते असा उल्लेख आहे. 'ओम'चा आवाज अत्यंत शुद्ध आणि सकारात्मक उर्जेशी संबंधित मानला जातो. यामुळे मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वात पहिले घंटी वाजवावी.

सोबतच घंटी वाजवण्याची एक शास्त्रीयगोष्ट अशी आहे की, मंदिरात घंटी वाजवल्याने वातावरणात तीव्र कंपने निर्माण होतात, त्यामुळे आजूबाजूचे जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. त्यामुळे मंदिरातील पर्यावरण शुद्ध करण्यासाठी मंदिरात घंटी वाजवली जाते.

  • मंदिरातून माघारी येताना घंटी वाजवणे अशुभ

मंदिरातून बाहेर पडताना अनेक लोक एकमेकांना पाहून घंटी वाजवतात. पण असे करणे अशुभ मानले जाते. कारण वास्तुशास्त्रानुसार मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवणे अशुभ मानले जाते. मंदिरातून बाहेर पडताना चुकूनही घंटी वाजवू नका, कारण यामुळे तुम्ही मंदिरातील सकारात्मक उर्जा तिथेच सोडता. यामुळे मंदिरातून बाहेर पडताना कधीही घंटी वाजवू नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

शक्तिशाली सौर वादळाची पृथ्वीला धडक; भारतातील लडाखसह युरोपीय देशांमध्ये विहंगम दृश्य

PM Modi Ban: "PM मोदींना 96 तास प्रचारासाठी बंदी घाला"; सिव्हिल सोसायटी गटांची निवडणूक आयोगाकडं तक्रार

KKR vs MI Live Score IPL 2024 : पावसामुळे नाणेफेकीस उशीर

SCROLL FOR NEXT