Radish Benefits Esakal
लाइफस्टाइल

Winters Radish Benefits: हिवाळ्यात मुळा खाण्याचे 5 जबरदस्त फायदे

मुळा नियमित खाल्ल्यास हिवाळ्यात त्वचा चमकदार होण्यास मदत होते

सकाळ डिजिटल टीम

हिवाळा (Winter) सुरू झाला की बाजारात मुळा, गाजर जास्त प्रमाणात दिसतो. अनेक घरात मुळा,(Radish) गाजरा (Carrot)पासून वेगवेगळे पदार्थ केले जातात. जसं कि पराठे, लोणचे, कोशिंबिर, सॅलड आणि बरेच काही. गाजराचे पदार्थ सहज खाल्ले जातात. मात्र मुळा अनेकांना आवडत नाही. मुळा हा फक्त हिवाळ्यातच येतो आणि या काळात तुम्ही तो जरूर खाणे गरजेचे आहे. मुळा हा औषधी गुणधर्मयुक्त आहे. याचे आरोग्याशी संबंधित अनेक फायदे आहेत. जाणून घ्या कोणते फायदे आहेत.

पचनक्रिया सुधारते

मुळा मध्ये फायबरचे प्रमाण जादा असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तुम्ही नियमित मुळा थोडा-थोडा खाल्ला तर तुमची आतड्याची हालचाल सुरळीत तर होतेच. शिवाय तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या होणार नाही. पोट निरोगी ठेवण्यास मुळा उपयुक्त आहे.

सर्दीशी लढा

मुळामध्ये कंजेस्टिव्ह गुणधर्म असतात जे घशातील श्लेष्मा साफ करण्याचे काम करतात. नाॅर्मली सर्दी वर कोणताही इलाज नाही. परंतु हिवाळ्यात होणाऱ्या सर्दीपासून काही काळ आराम मिळु शकतो.

प्रतिकारशक्ती वाढवते

मुळ्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवते. यात असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्सन तुमच्या हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. शिवाय यात जीवनसत्त्वे ए, सी, ई, बी 6, पोटॅशियम आणि इतर खनिजे असतात. दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला या भाजीचे नियमित सेवन करावे लागेल.

रक्तदाबावार नियंत्रण

हपोटॅशियमने समृद्ध असणारा मुळा शरीरात सोडियम-पोटॅशियम संतुलित राखून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. यात हायपरटेन्सिव्ह गुणधर्म असतात. हिवाळ्यात प्रत्येकाने आवर्जून खायला हवा. जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर जाणीवपूर्वक मुळा खावा.

त्वचेसाठी फायदेशीर

मुळ्याचा उपयोग त्वचेसाठी फायदेशीर आहे. यात फॉस्फरस आणि जस्त असते. यामुळे कोरडेपणा कमी होतो. पुरळ पासून मुक्तता मिळण्यास मदत होते. मुळा शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करतो. मुळा नियमित खाल्ल्यास हिवाळ्यात त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT