World Breastfeeding Week Sakal
लाइफस्टाइल

World Breastfeeding Week: स्तनपानामुळे आई अन् बाळाला कसा फायदा होतो, जाणून घ्या एका क्लिकवर

World Breastfeeding Week: दरवर्षी ऑगस्टचा पहिला आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जाणून घेऊया स्तनपान करण्याचे फायदे कोणते आहेत.

Puja Bonkile

World Breastfeeding Week: दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश मातांना स्तनपानाच्या महत्वाविषयी जागृत करणे हा आहे. यावर्षीच्या स्तनपान सप्ताहासाठी ‘आई आणि बाळामधील अंतर कमी करूया, स्तनपानाला समर्थन देऊया’ ही थीम निश्चित करण्यात आली. या थीमद्वारे नवजात बालकांचे वडील, त्यांचे कुटुंब, आरोग्यसेवा प्रदाते आणि संपूर्ण समाजाचा स्तनपानाला पाठिंबा घेण्यावर भर देण्यात आला आहे. स्तनपान हे मुलांसाठी फायदेशी असून आईच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. आईचे दूध बाळांसाठी टॉनिकच मानले जाते. यामुळे मुलांचा योग्य विकास होतो.

स्तनपासाठी शांत आणि सकारात्मक वातावरण असणे गरजेचे आहे. स्तनपान नवीन झालेल्या आईसाठी एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे त्यांना सुरुवातीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि कधीकधी हे निराशेचे कारण देखील बनू शकते. प्रसूतीनंतर नवीन आई अनेक टप्प्यांतून जाते. प्रसूतीनंतरचे नैराश्य, मुलाशी संबंध नसणे, मुलांच्या संगोपनाची चिंता, या सर्व गोष्टींचा स्तनपानाच्या प्रक्रियेवर देखील परिणाम होऊ शकतो. अशावेळी जोडीदारासह कुटुंबाचा पाठिंबा असणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया स्तनपान करण्याचे कोणते फायदे आहेत.

स्तनपान करण्याचे कोणते फायदे आहेत

आरोग्य निरोगी राहते

स्तनपान केल्याने बाळाची लवकर वाढ होते. तसेच आईचे दूध प्यायल्याने बाळाची बुद्धी चांगली राहते.

बाँडिंग

स्तनपानामुळे आई आणि बाळामधील भावनिक संबंध वाढण्यास मदत मिळते. तसेच दोघांचे नातं अधिक घट्ट होते.

आजारांचा दूर राहतात

स्तनपान केल्याने मुलाचे तसेच आईचे अनेक गंभीर आजार दूर राहतात. जसे की संक्रमण, अॅलर्जी, जुनाट आजारांपासून रक्षण होते. स्तनपानामुळे आईच्या गर्भाशयाला प्रसूतीनंतर त्याचा आकार परत मिळण्यास मदत मिळते.

वजन नियंत्रणात राहते

स्तनपानानंतर वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. दूध उत्पानासाठी स्तनपानासाठी अतिरिक्त ऊर्जा आणि कॅलरीज गरजेचे असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT