आपण कधीतरी चेष्टेने कुणाला तरी म्हणतो की, प्रत्येक माणसाचा एक दिवस असतो. तसं पृथ्वीवरील प्रत्येक घटकाचा एक विशेष दिवस असतो. ज्या दिवशी ती गोष्ट तो सजीव आपल्याला सापडलेला असतो त्या दिवशी तो त्याचा दिवस होतो.
जसा पृथ्वीचा दिवस असतो, तसा आज चंद्राचाही दिवस आहे. म्हणजेच आज जागतिक चंद्र दिवस आहे. हा दिवस का साजरा केला जातो आणि चंद्राबद्दलच्या काही रोचक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.
चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. सूर्याची गरज आपल्या सर्वांना आहे तसेच आपल्याला चंद्राची ही गरज आहे. चंद्र केवळ रात्रीचा प्रकाश देत नाही. तर पोर्णिमा अमावस्येला आणि समुद्राच्या भरती ओहोटीलाही चंद्र महत्वाची भूमिका पार पाडतो.
20 जुलै रोजी चंद्र दिवस साजरा केला जातो. कारण 1969 मध्ये अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग आणि बच एल्ड्रिन यांनी चंद्रावरती पहिलं पाऊल टाकले होते. त्यामुळेच आजच्या दिवशी जागतिक चंद्र दिवस साजरा केला जातो. त्या दिवसाचे निमित्त साधून आज आपण चंद्राबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
चंद्र ग्रह आहे का ?
आपल्या अंतराळात पृथ्वी हा महत्त्वाचा ग्रह आहे. तर अशाच प्रकारचे अनेक ग्रह सुद्धा अंतराळात आहेत. पण अनेक लोकांना असेच वाटतं की चंद्र सुद्धा ग्रह एक आहे. पण तसं नाही, चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्र हा सूर्यमालेतील पाचव्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे.
वैज्ञानिक असं म्हणतात की, साडेचार अब्ज वर्ष आधी पृथ्वी आणि थिया (मंगळाच्या आकाराचे तत्व) यांची जोरदार धडक होऊन त्यातून चंद्राचा जन्म झाला आहे. असं वैज्ञानिकांचे संशोधन सांगते.
खरंच चंद्रावरती वजन कमी होतं का?
वर्ष 1969 मध्ये चंद्रावरती पहिल्यांदा मानवाने पाऊल ठेवलं होतं. सायन्स असं सांगतं की, चंद्रावरती गुरुत्वाकर्षण शक्ती कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तिथे माणसाचं वजन कमी कमी होतं. वजनातील हा फरक इतका आहे, की पृथ्वीवर जर त्या व्यक्तीचे वजन 100 किलो असेल. तर त्याहून 16 टक्के होऊन कमी वजन चंद्रावरती भरेल. लोकांना आणि सर्वांना ही एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे.
चंद्राचा आपल्या झोपेवर प्रभाव पडतो का?
तुम्हालाही असं जाणवलं असेल की, तुम्हाला अमावस्येदिवशी चांगली झोप लागते. तर पौर्णिमेदिवशी कमी झोप लागते. असं का होत असेल याचा कधी विचार केलाय का? तर या मागे सायन्स आहे. तेही चंद्राचा आपल्या झोपेवर प्रभाव पडतो. ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशी आपल्याला शांत झोप लागते. पौर्णिमेदिवशी जेव्हा चंद्र पूर्ण आकारात असतो. तेव्हा आपण रात्रभर कूस बदलत राहतो. पण आपल्याला शांत झोप लागत नाही या गोष्टीवर अजूनही रिसर्च सुरू आहे.
चंद्र गायब होणार आहे?
चंद्राबाबत असं नेहमीच तुम्ही ऐकलं असेल की, एक दिवस चंद्र गायब होणार आ.हे आता फक्त तो महिन्यातील एखाद्या दिवशी म्हणजे अमावस्या दिवशी गायब होतो. पण असाही एक दिवस येईल की, संपूर्ण जगातून कायमचा चंद्र नाहीस होईल. त्याचं कारण असं सांगितलं जातं की, दरवर्षी चंद्र पृथ्वीपासून 3.78 सेंटीमीटर दूर जात आहे.
सध्या चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 27 दिवस आणि सहा तास लागतात. पण जर चंद्र दूर जात राहिला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 47 दिवस ही पुरेसे होणार नाही. हे असंच सुरू राहिलं तर चंद्र अंतराळ अंतराळातच कुठेतरी हरवून जाईल. चंद्र गायब झाला तर पृथ्वीवरती फक्त सहा तासांचा दिवस असेल आणि पूर्ण वेळ अंधारा असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.