World Rainforest Day: Sakal
लाइफस्टाइल

World Rainforest Day: आपल्यासाठी जंगले किती महत्त्वाची आहेत अन् पहिला जागतिक पर्जन्यवन दिवस कधी साजरा करण्यात आला? वाचा एका क्लिकवर

World Rainforest Day: पर्जन्यवनदिनानिमित्त जाणून घेऊया जंगलाचे जतन करणे पर्यावरण संतुलनासाठी किती महत्वाचे आहे.

पुजा बोनकिले

World Rainforest Day: देशात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे तर अनेक ठिकाणी लोक कडाक्याच्या उन्हाने हैराण झाले आहे. उन्हाळ्यातील थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या अशा देश आणि राज्यांमध्येही तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्वांमागील सर्वात मोठे कारण म्हणजे जंगलतोड आहे. म्हणूनच आज 22 जून हा जागतिक पर्जन्यवन दिन जगभरात पर्जन्यवनांच्या महत्त्वाची जाणीव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. 

घनदाट जंगलांमुळे शुद्ध हवा, पाणी आणि ऑक्सिजन आपल्याला मिळते. त्याचबरोबर जंगलांच्या कमतरतेमुळे संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग या समस्येला सामोरे जात आहे. पण आता तरी मानवाने वेळीच जागी होऊन झाडे आणि जंगलांचे जतन करण्यास पुढे यावे. तुम्हाला माहित आहे का जागतिक पर्जन्यवन दिन का साजरा केला जातो आणि पृथ्वीवर जंगले असणे इतके महत्त्वाचे का आहे?

ऑक्सिजची आवश्यकता

जिवन जगण्यासाठी ऑक्सिजन खुप गरजेचा आहे. जगभर असलेल्या पर्जन्यवनांमुळेच ऑक्सिजन आपल्यापर्यंत पोहोचत आहे. रेन फॉरेस्ट ही पृथ्वीवरील सर्वात जुनी जिवंत परिसंस्था आहे. जागतिक पर्जन्यवन दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे पर्जन्यवनांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज याबद्दल लोकांमध्ये जागरूकता करणे.

जागतिक पर्जन्यवन दिनाची सुरूवात कधी झाली?

जागतिक पर्जन्यदिनाची सुरूवात रेनफॉरेस्ट पार्टनरशिप संस्थेने केली. 2017 मध्ये प्रथमच जगभरातील बहुतेक देशांमध्ये याला मान्यता मिळाली. अशा परिस्थितीत, ऑस्टिन, टेक्सास येथील ना-नफा पर्यावरण संस्था रेनफॉरेस्ट पार्टनरशिपने जागतिक कार्यक्रम सुरू केला तेव्हा 22 जून 2017 रोजी पहिला जागतिक पर्जन्यवन दिन साजरा करण्यात आला. वर्षावनांच्या अमूल्य योगदानाबद्दल जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. यानंतर, सर्व क्षेत्रातील लोक आणि संस्थांना एकत्र आणण्यासाठी 2021 मध्ये जागतिक पर्जन्यवन दिन शिखर परिषद सुरू करण्यात आली.

ग्लोबर वॉर्मिंग करते कमी

वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून आणि पृथ्वीवरील ऑक्सिजनची पातळी राखून वर्षावन ग्लोबल वार्मिंग कमी करतात आणि हवामान संतुलन आणि ग्लोबल वार्मिंग नियंत्रित करण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका बजावतात.

जगातील सर्वात मोठे रेनफॉरेस्ट

जगातील सर्वात मोठे रेनफॉरेस्ट ॲमेझॉन आहे. हे 5.5 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त, 1.4 अब्ज एकरामध्ये वसलेले आहे. ब्राझील, पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, गयाना, सुरीनाम आणि फ्रेंच गयाना यासह दक्षिण अमेरिकेतील विस्तीर्ण प्रदेश यामध्ये समाविष्ट आहेत.

औषधी वनस्पती

रेन फॉरेस्टमध्ये औषधी वनस्पती भरपूर आहेत. जे पारंपारिक आणि आधुनिक औषधांमध्ये अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT