Yoga For Women: पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम किंवा PCOS हा सध्या स्त्रियांमध्ये खूप प्रकर्षाने उद्भवणारा विकार आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे जास्तीत जास्त वेळ स्क्रीनच्या समोर बसून काम करणे, त्यामुळे शरीराची हालचाल खंडित होणे यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे वजन वाढणे, डायबीटीज, रक्तदाब सारखे दीर्घकालीन आजार होणे, हार्मोनल इम्बॅलन्स होणे अश्या समस्या वाढू लागल्या आहेत.
अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावर आणि शरीरावर जास्तीचे केस, पुरळ, असामान्य वजन वाढणे, केस पातळ होणे, तसेच अंडाशयात अनेक सिस्ट असणे. ही एखाद्या महिलेला PCOS असण्याची सामान्य लक्षणे आहेत.
२०१४ साली नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या जर्नल लेखात, संशोधकांना असे आढळून आले की, ज्या महिलांना PCOS चे निदान झाले आहे त्यांना केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्यांचाही सामना करावा लागतो.
"या विकारामुळे लठ्ठपणा, हिर्सुटिजम(चेहऱ्यावर आणि शरीरावरील अनावश्यक केस), पुरळ, केस गाळाने यामुळे त्यांच्या सौंदर्य बिघडते. याव्यतिरिक्त, परिणामी मासिक पाळीच्या विकारांमुळे आणि वंध्यत्वामुळे त्यांच्या स्त्रीत्वाची भावना विस्खलित झाली आणि त्यामुळे बऱ्याच महिलांना लाज वाटून आत्मविश्वास कमी झाला होता कारण ते स्वतःला इतर स्त्रियांपेक्षा कमी दर्जाचे समजत होते,” असे अभ्यासात स्पष्ट झाले.
भारतामध्ये अनेक महिलांना PCOS होण्याचे प्रमाण वाढले आहे. अधिक व्यस्त जीवनशैली, त्यामुळे तणावात झालेली वाढ, तसेच कमीत कमी वेळात जास्त काम पूर्ण करायचे असल्यामुळे अनेकदा मल्टिटास्किंग करणे, यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊन आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
योग. योग ही भारताला मिळालेली एक देणगी आहे. व्यायाम आणि योग्य आहारासोबतच योग केल्याचे अनेक फायदे आहेत. योगा आपल्याला शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतो. योगाने शरीराला लवचिकता येते तर मन एकाग्र आणि शांत राहायला मदत होते.
दररोज योगा करणे PCOS नियंत्रित ठेवण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. योगामुळे ओटीपोट मोकळे होण्यास मदत होते, त्या भागात खोलवर साठलेला ताण सोडला जातो आणि मन आणि शरीर या दोघांनाही पूर्ण विश्रांती मिळते.
परंतु फक्त योगा केल्याने हा विकार नियंत्रित राहणार नाही. त्यासाठी पुरेशी झोप घेणे, ताणाचे व्यवस्थापन करणे आणि पोषक आहाराचे सेवन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
चक्की चालनासन (जातं फिरवणे)
यामध्ये शरीराच्या गोलाकार हालचालींचा समावेश होतो आणि मणक्याच्या लवचिकतेसह पचन सुधारण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी खाली पाय पसरून बसा, जेणेकरून इंग्रजी अक्षर वि तयार होईल. यानंतर हात खांद्याच्या रेषेत समोर घेऊन बोटे एकमेकात गुंता आणि जसे जाते फिरवले जाते तसे गोलाकार हालचाल करा.
बद्ध कोनासन(बटरफ्लाय पोज)
याला बटरफ्लाय पोज म्हणूनही ओळखले जाते. हे आसन नितंब आणि मांडीचा सांधा उघडून पुनरुत्पादक अवयवांना(रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स) उत्तेजित करते. हे आसन करताना बसलेल्या स्थितीतून,तुमच्या पायांचे तळवे एकत्र तुमच्या ओटीपोटाजवळ आणा, आणि तुमचे गुडघे बाजूला पडू द्या.
सुप्त बद्ध कोनासन
'सुप्त' म्हणजे 'झोपून'. त्यामुळे झोपून केलेले बद्ध कोनासन म्हणजे सुप्त बद्ध कोनासन. या आसनामुळे तुमच्या आतील मांड्याना खोलवर ताण मिळतो. त्यामुळे शरीराचा खालील भाग अराम स्थितित जातो आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
भारद्वजासन
हे आसन शरीराचे पचन आणि शरीर शुद्ध करण्यास मदत करते. हे आसन करताना पाय क्रॉस करा आणि एका पायावर पाय ठेवून, दुसऱ्या पायाच्या घोट्याला ओढा. त्यानंतर, शरीर ध्रूव रेषेत वळवून, कंबरेपासून वळण घेत शरीराला ताण द्या आणि दोन्ही हातांचा उपयोग करून साखळी पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करा.
भुजंगासन
सामान्यतः याला कोब्रा पोज म्हणून ओळखले जाते. या आसनामुळे मणका मजबूत होतो आणि छाती उघडण्यास मदत होते. तसे शरीर लवचिक बनते. ज्यामुळे ताण कमी होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. हे आसन करताना पोटावर झोपा आणि आपले हात आपल्या छातीच्या रेषेत आणि कोपर आपल्या शरीराच्या जवळ ठेवा. आता छाती वर करताना हात एकत्र दाबा, कोपर वाकवा. नंतर गाभा घट्ट करा आणि पाठीचा कणा मागे करा. खांदे आपल्या मागे खेचा.
वरील आसने करताना योग्य श्वासोछ्वास करावा. तसेच शरीराच्या कुवतीप्रमाणेच योगासने करावीत. काही अडचण जाणवल्यास डॉक्टर किंवा योग तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
वरील आसनांव्यतिरिक्त, उत्तम परिणामांसाठी प्राणायाम किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि विश्रांतीचे व्यायामदेखील दररोज केले पाहिजे. जसे की डीप ब्रिदींग, कुंभक श्वसन(श्वास थांबवून श्वसनाच्या प्रक्रियेला नियंत्रित करणे), अनुलोम-विलोम शवासन, इ. प्राणायाम करावेत.
तसेच PCOS नियंत्रणासाठी गांभीर्याने विचार करत असलेल्या महिलांनी पौष्टिक आहार घेणे जंक फूड टाळणे आवश्यक आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.