Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : मुंबईतील मशिदींमधून निवडणुकीचे फतवे;शिवसेना सचिव पावसकर यांचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान न होण्यासाठी मुंबईत पोस्टर्स लावून समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान न होण्यासाठी मुंबईत पोस्टर्स लावून समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. मुंबईतील ३७ मशिदींनी फतवे जारी केले असून निवडणुकीत सहकार्यासाठी मुसलमानांवर दबाव टाकणे, बॅनर्स आणि पोस्टर्स लावणे, प्रचारासाठी मुल्ला-मौलवींचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर केला.

या सर्वांचे सूत्रधार खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून यासाठी त्यांना परदेशातून पैसा आला का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी पावसकर यांनी केली. ते म्हणाले, की जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संस्थेविरोधात शिवसेनेकडून जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गेले वर्षभरापासून संजय राऊत म्हणायचे की, निवडणुकीपूर्वी दंगली घडतील. ते असे का बोलत होते? ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात पाकिस्तानचा झेंडा, बॉम्बस्फोटातील आरोपी होते. त्यावर पोलिसांनी कारवाई करावी. याचे सूत्रधार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे असून त्यांना परदेशातून पैसा आला का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी पावसकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT