Satara Lok Sabha Constituency  esakal
लोकसभा २०२४

Satara Loksabha : साताऱ्यात पाहायला मिळणार तगडी फाईट; उदयनराजेंविरोधात बिचुकले उतरणार लोकसभेच्या रिंगणात!

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती (Mahayuti), महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

सातारा लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीचे कोण उमेदवार असणार याची उत्सुकता ताणली आहे.

Satara Lok Sabha Constituency : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती (Mahayuti), महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपमध्ये (BJP) या मतदारसंघात रस्सीखेच सुरू आहे.

अशातच आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Bigg Boss Fame Abhijeet Bichukale) यांनीही सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे सातारा शहरातून या मतदारसंघात आणखी एका उमेदवाराची भर पडली आहे.

देशाचे संविधान वाचविण्यासाठी आपण ही लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सातारा लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीचे कोण उमेदवार असणार याची उत्सुकता ताणली आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी देण्याचा शब्द केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिलाय.

तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितीन पाटील इच्छुक आहेत. शिवाय, दुसरीकडे शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही तयारी केली आहे. अशातच भाजपकडून नरेंद्र पाटील हेही मैदानात उतरणार असे सांगत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT