agitation of Trinamool leaders Insist on demand to transfer heads of investigative agencies  Sakal
लोकसभा २०२४

तृणमूलच्या नेत्यांचे ठिय्या आंदोलन; तपास संस्थांच्या प्रमुखांची बदली करण्याच्या मागणीवर ठाम

ईडी, सीबीआय, एनआयए आणि प्राप्तिकर विभागाच्या प्रमुखांची बदली करण्याच्या मागणीसाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी मंदिर मार्ग पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ईडी, सीबीआय, एनआयए आणि प्राप्तिकर विभागाच्या प्रमुखांची बदली करण्याच्या मागणीसाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी मंदिर मार्ग पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह अन्य आप नेत्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला.

तपास संस्थांच्या प्रमुखांची बदली करण्याच्या मागणीसाठी तृणमूलच्या नेत्यांनी मागील सोमवारी निवडणूक आयोगासमोर धरणे आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी डेरेक ओ ब्रायन, नदीमूल हक, साकेत गोखले, डोला सेन, सागरिका घोष या खासदारांसह आमदार विवेक गुप्ता, माजी खासदार अर्पिता घोष, शंतनू सेन, अबीर रंजन, सुदीप राहा नेत्यांना ताब्यात घेऊन मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात नेले होते.

काही वेळानंतर पोलिसांनी नेत्यांची सुटका केली होती, मात्र तृणमूल नेत्यांनी पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या मारला. काल रात्रभर हे नेते पोलिस ठाण्याबाहेर बसून होते. आज सकाळी आप नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. आप नेते व दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी यावेळी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशात आचारसंहिता लागू आहे, अशावेळी सर्व संस्था आणि निवडणूक आयोगाने तटस्थ राहून काम करणे अपेक्षित आहे.

प्रत्यक्षात तपास संस्थांकडून आचारसंहितेच्या काळात विरोधी नेत्यांच्या छापेमारी केली जात आहे. विरोधी पक्षांना गप्प करण्याचा हा डाव आहे. भाजपचे नेते आंदोलन करतात, तर त्यांना अटक केली जात नाही. विरोधी नेते आंदोलन करतात तर त्यांना उचलून पोलिस गाडीत टाकले जाते, असा आरोप भारद्वाज यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT