Sujay Vikhe vs Nilesh Lanke  sakal
लोकसभा २०२४

Nagar Lok Sabha MockPoll : सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या ४० मतदान केंद्रांवर होणार 'मॉकपोल'; निवडणूक आयोगाचे आदेश

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या सुजय विखे पाटील यांनी काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नगर : लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या सुजय विखे पाटील यांनी काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. त्यानुसार या केंद्रांवरील मतांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडं केली होती. यापार्श्वभूमीवर आक्षेप घेण्यात आलेल्या या ४० मतदान केंद्रांवर मॉकपोल घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक आयोगाला दिल्या आहेत.

त्यामुळं आता या आक्षेप घेण्यात आलेल्या बुथवरील ईव्हीएमची मेमरी रिकामी करुन मतांची पडताळणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्देशांमुळं विखेंसाठी हा दिलासा मानला जात आहे. पण या तपासातून काय समोर येतं हे पहाणं महत्वाचं असणार आहे.

असा होणार मॉकपोल

  1. आक्षेप घेण्यात आलेल्या ४० ईव्हीएम मशिनची मेमरी रिकामी करणार

  2. एका मशिनमध्ये प्रत्येकी १ ते १४०० मतं टाकता येणार

  3. किती मतं द्यायची हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना असणार आहे.

  4. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममशिनवरील मतांची पडताळणी होणार

  5. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडणार

४ जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर १० जून रोजी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनची आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी असा अर्ज पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडं केला होता. यापार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला काल एक पत्र लिहून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार इथं आता मॉकपोल होणार आहे. पण आता ही प्रक्रिया नेमकी कधी पार पडते हे पहावं लागणार आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये एकीकडं भाजपचे विद्यमान सुजय विखे पाटील आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये निलेश लंके यांचा अवघ्या २९ हजार मतांची विजय होऊन ते खासदार बनले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! अर्जुननंतर अस्मितासमोर येणार सचिनच्या अफेअरचं सत्य; सासूबाईंसमोरच साक्षीला करतोय किस

महापालिका निवडणुकांआधी मोठा राजकीय बॉम्ब! ठाकरे बंधूंनंतर आता अजून एक भावांची जोडी एकत्र येणार? दलित मतांचे एकत्रीकरण होणार

Aquarius success astrology: कुंभ राशीवाल्यांनी 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा! वर्षभर अपघात टळतील अन् यशाची दारं उघडतील

Sports Tournament in 2026: क्रिकेट ते फुटबॉल वर्ल्ड कप... २०२६ मध्ये क्रीडा स्पर्धांची सर्वात मोठी पर्वणी; 'या' तारखा नोट करून ठेवा

आता गणिताची कोडी सोडवणार अयोध्येचे 'राम मंदिर'; उत्तर प्रदेशातील इयत्ता चौथीच्या पुस्तकांमध्ये मोठे बदल

SCROLL FOR NEXT