Loksabha NDA sakal
लोकसभा २०२४

Loksabha NDA : मंत्रिमंडळासाठी मंथन सुरू ; ‘एनडीए’तील ज्येष्ठ नेत्यांचे दिवसभर बैठकांचे सत्र

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांनी केलेल्या मागण्यांवर विचार करून भाजपच्या मंत्रिमंडळातील रचना ठरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, आज दिवसभर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू राहिले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांनी केलेल्या मागण्यांवर विचार करून भाजपच्या मंत्रिमंडळातील रचना ठरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, आज दिवसभर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू राहिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी येत्या शनिवार किंवा रविवारी होण्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु जेडीयू व टीडीपीने दिलेल्या प्रस्तावांमुळे भाजपपुढे मंत्रीमंडळ रचनेचे संकट उभे ठाकले आहे. टीडीपीने लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याचे समजते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जी. एम. बालयोगी हे टीडीपीचे लोकसभा अध्यक्ष होते. त्याच धर्तीवर आता टीडीपीचे लोकसभा अध्यक्ष व्हावा, असा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय दोन्ही पक्षांनी काही महत्त्वपूर्ण खाती मागितली आहे.

या पार्श्वभूमीवर आज भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या निवासस्थानी आज दिवसभर चर्चा झाल्या. भाजपचे नेते अमित शहा यांनी यांनी जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे संघटन महासचिव बी. एल. संतोषही उपस्थित होते. यावेळी भाजपने कोणतीही खाती ठेवायची, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी सुद्धा आज जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. विनोद तावडे हे बिहारचे प्रभारी असून या राज्यात भाजपने चांगली कामगिरी केली आहे. विविध राज्यांच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे सत्र भाजपच्या नेत्यांनी सुरू केले आहे.

मंत्रिमंडळाबाबत उद्या, शुक्रवारीही अनेक नेत्यांशी चर्चा होणार आहे. एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक उद्या, शुक्रवारी दिल्लीत होणार आहे. यासाठी विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व विधानसभांमधील गटनेते उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT