Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : जिंकण्याच्या निकषावर जागावाटप ,आशिष शेलार : निवडणूक ‘मोदी विरुद्ध गांधी’ अशीच होणार

‘प्रत्येक पक्षाला संघटन वाढविण्याचा अधिकार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असतात. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी चर्चा करून जिंकून येण्याच्या निकषावर जागावाटप केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘प्रत्येक पक्षाला संघटन वाढविण्याचा अधिकार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असतात. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी चर्चा करून जिंकून येण्याच्या निकषावर जागावाटप केले आहे. आम्ही कोणाच्याही जागा कमी केलेल्या नाहीत,’’ असे मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा पुण्यात मेळावा आयोजित केला होता. तत्पूर्वी शेलार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले, ‘‘निवडणूक देशाची असल्याने ‘मोदी विरुद्ध गांधी’ अशी होत आहे. मोदी युवकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी अपेक्षा राज ठाकरे यांना आहे म्हणूनच त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला.’’

महायुतीमध्ये तडजोड : सामंत

महायुतीमध्ये राजकीय तडजोड आहे. नारायण राणे इच्छुक नव्हते; मग ते आता का तयार झाले? यावर आता चर्चा करून उपयोग नाही. त्यांनी अर्ज भरला आहे. महायुतीच्या जागा वाटपात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सर्वांचा सन्मान करत जागा वाटप केले आहे. देशभरात आम्ही ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असून पुणे जिल्ह्यातील चारही जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शेलार म्हणाले, ‘पराभव होणार’

पत्रकार परिषदेत बारामतीच्या जागेचे काय, असे विचारले असता सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार आहे, असे शेलार चुकून बोलून गेले. चूक लक्षात येताच सुनेत्रा पवार जिंकणार आहेत, असे म्हणत सारवासारव केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT