Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : माजी न्यायाधीश गंगोपाध्याय यांना प्रचार करण्यास मज्जाव;निवडणूक आयोगाकडून एका दिवसाची मनाई

कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भाजपचे पश्चिम बंगालमधील तुमलूक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अभिजित गंगोपाध्याय यांना प्रचार करण्यासाठी एक दिवसाची मनाई करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भाजपचे पश्चिम बंगालमधील तुमलूक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अभिजित गंगोपाध्याय यांना प्रचार करण्यासाठी एक दिवसाची मनाई करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिजित गंगोपाध्याय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल अपमानास्पद आणि असभ्य वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी ही बंदी घालण्यात आली आहे.

‘‘या वक्तव्याने अभिजित गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असून हे वक्तव्य खालच्या स्तराचे आणि व्यक्तीगत आहे,’’ असे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केले आहे.

अभिजित गंगोपाध्याय यांनी १५ मे रोजी एका प्रचार सभेत ममता यांच्याबद्दल असभ्य वक्तव्य केले होते. यावरून आदर्श आचार संहिता भंग केल्याची नोटीस केंद्रीय निवडणूक आयोगाने बजावल्यानंतर गंगोपाध्याय यांनी दिलेल्या उत्तराने निवडणूक आयोगाचे समाधान झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: ''गौरव मोरेसुद्धा घाबरलेला'', प्रवीण गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

Latest Maharashtra News Updates : 'प्रधानमंत्री धन-धनय कृषी योजने' ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्याबाबत रिट्विट केल्याप्रकरणी व्यापारी अटकेत

Kamika Ekadashi 2025: कधी आहे कामिका एकादशी? जाणून घ्या तारिख, तिथी आणि या दिवसाचे महत्त्व

Virat Kohli-Rohit Sharma: 'विराट-रोहितची कमी भासते, पण BCCI ची पॉलिसी आहे की...' उपाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT