Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : भीमशक्तीचा काँग्रेसला पाठिंबा ; चंद्रकांत हंडोरे ,राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव

भाजपचा ‘४०० पार’चा नारा हा दोन तृतीयांश बहुमतासाठी असून, ते मिळाले की भाजप राज्यघटना बदलणार, हे त्यांचे नेतेच जाहीरपणे सांगत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपचा ‘४०० पार’चा नारा हा दोन तृतीयांश बहुमतासाठी असून, ते मिळाले की भाजप राज्यघटना बदलणार, हे त्यांचे नेतेच जाहीरपणे सांगत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी भीमशक्ती काँग्रेस आघाडीला पाठिंबा देत असल्याचे भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष, खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी जाहीर केले.

चेंबूर येथे शनिवारी भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ऑनलाइन संबोधित केले. हंडोरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ४०० जागांवर विजय मिळवण्यामागचा भाजपचा हेतू दोन तृतीयांश बहुमत मिळवणे व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना बदलणे हा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना बदलल्यानंतर रा.स्व. संघाचा मनुवादी धोरण लागू होईल. भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी भीमशक्तीने महाविकास आघाडी व ‘इंडिया’ आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा ठराव केला आहे.

आंबेडकरी जनतेत जनजागृती करणार

‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना वाचवणे ही आंबेडकरी जनतेची जबाबदारी आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राज्यघटना व लोकशाही वाचवण्यासाठी देशभर पदयात्रा काढून जनजागृती केली आहे. भाजपचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी भीमशक्तीचे कार्यकर्ते दलित समाजात जनजागृती करतील, घरोघरी जातील, तालुका, जिल्हा, गावागावांत जातील,’’ असे चंद्रकांत हंडोरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT