Chandrapur Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Chandrapur Lok Sabha: प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सलचा शिक्का, काँग्रेसचा आरोप! चंद्रपुरात मतदान केंद्रावर राडा

Chandrapur Lok Sabha : चंद्रपूरमध्ये मतदान केंद्रावर राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुंगंटीवार यांच्यात लढत होत आहे.

Sandip Kapde

Chandrapur Lok Sabha

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी म्हणजेच आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले आहे. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान चंद्रपूरमध्ये मतदान केंद्रावर राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. चंद्रपूरमधील हिंदी सिटी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर राडा झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर राडा केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केल्यामुळे मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

नेमकं काय घडलं?

चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुंगंटीवार यांच्यात लढत होत आहे. हिंदी सिटी हायस्कूल मतदान केंद्रावर प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला केला. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत पक्षपात केला जात असल्याचा आरोप केला. प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का काम मारला, असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. तसेच निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT